'आंतरराष्ट्रीय डंका वाजवण्याची वेळ...' लंडनमधून ध्रुव राठीची हाक; कधी होणार आंदोलन?

मुंबई तक

17 Oct 2026 (अपडेटेड: 17 Oct 2026, 12:01 PM)

ध्रुव राठी यांची एक्स पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. यामध्ये त्यांनी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवण्याची वेळ आल्याचं म्हटलं आहे.

Dhruv Rathee London Post

Dhruv Rathee London Post

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

ध्रुव राठी यांची एक्स पोस्ट व्हायरल

point

लंडनमध्ये करणार आंदोलन

Dhruv Rathee London Post : सीजेपीच्या (CJP) तिरंगा रॅलीदरम्यान अभिजीत दिपके आणि नेहा बोरा यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. नेहा बोरा यांना आज (17 ऑक्टोबर) पहाटे सोडून देण्यात आले असून अभिजीत दिपके यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर, प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी यांनी आपल्या अधिकृत 'एक्स' अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे, ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

हे वाचलं का?

'आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवण्याची वेळ'

लंडनमध्ये पोहोचताच ध्रुव राठी यांनी या पोस्टच्या माध्यमातून थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "मी नुकताच लंडनमध्ये पोहोचलो आहे. आता वोट चोर आणि लोकशाहीच्या मारेकऱ्यांचे सत्य जगासमोर आणण्याची वेळ आली आहे." तसेच, "आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका वाजवण्याची वेळ आली असून, जर तुम्ही लंडनमध्ये असाल तर (17 ऑक्टोबर) दुपारी 12 वाजता पार्लमेंट स्क्वेअरमधील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हा," असे आवाहन त्यांनी केले आहे.

हे ही वाचा : तीन महिन्यापूर्वी IT जॉबसाठी पुण्यात शिफ्ट झालेल्या तरुणासोबत काय घडलं?

दीपके यांची अटक बेकायदेशीर

दरम्यान, या संपूर्ण घडामोडींमुळे देशांतर्गत राजकारणासह परदेशातही या प्रकरणाचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट अल्पावधीतच व्हायरल झाली असून, यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान,  सीजेपीच्या लीगल हेड रत्ना सिंग यांनी अभिजीत दीपके यांची अटक बेकायदेशीर असून त्यांची तातडीने सुटका करण्यात यावी अशी मागणी केली आहे. 

हे ही वाचा : नवी मुंबई : बायकोच्या गुगल पेवर सतत पैसे यायचे, नवऱ्याला संशय आला अन्...

न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

सीजेपीचे सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आता अभिजीत दीपके यांच्याबाबतीत न्यायालय काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.