Rahul Gandhi Letter to CM Devendra Fadnavis : देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुण्यात घेतलेल्या ‘छात्रो की गूंज’ या कार्यक्रमात एका आदिवासी तरुणीने मांडलेल्या प्रश्नांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पुण्यातील मांजरी भागात आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू असून, त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले जात नसल्याची तक्रार या तरुणीने राहुल गांधी यांच्यासमोर केली होती. विद्यार्थ्यांच्या या प्रश्नाची राहुल गांधी यांनी दखल घेतली असून, आता त्यांनी हा मुद्दा थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडला आहे. यासंदर्भात राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : घरगुती वाद की आणखी काही? तिघांच्या मृत्यूचं कारण काय? दोन्ही कुटुंबियांचे वेगवेगळे दावे
आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा उल्लेख, फडणवीसांना राहुल गांधींचं पत्र
राहुल गांधी यांनी आपल्या पत्रातून आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा उल्लेख केला आहे. तसेच त्यांनी आदिवासी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्यांचे समाधान करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक्सवर एक पोस्टही केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील अनेक आदिवासी विद्यार्थी दहा दिवसांहून अधिक काळ आपल्या अधिकारांसाठी उपोषण करत असल्याचं म्हटलं आहे. पुण्यातील ‘छात्रो की गूंज’ कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी आपल्या समस्या राहुल गांधी यांच्यासमोर मांडल्या होत्या.
हेही वाचा : पॉर्न साईटवर टाकले बायकोचे व्हिडीओ, चार वर्षांच्या मुलीसमोरच लज्जास्पद कृत्य; पुढं काय घडलं?
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी
आदिवासी विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रश्नांमध्ये वसतिगृहांशी संबंधित विविध मागण्यांचा समावेश असल्याचं राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. वसतिगृहांमध्ये 30 वर्षांची अनावश्यक वयोमर्यादा, अपमानास्पद नियम, असुरक्षित सुविधा आणि महिलांसाठी गर्भावस्थेत तपासणीसारख्या तरतुदी असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. दूरच्या गावांमधून आणि कसब्यांमधून येणारे विद्यार्थी कोणताही दान मागत नसून, ते आपला अधिकार मागत असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी विद्यार्थ्यांची वैयक्तिकरित्या भेट घ्यावी आणि त्यांच्या समस्यांचं तातडीने समाधान करावं, अशी अपेक्षा राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे. या माध्यमातून पुण्यात सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा मुद्दा आता थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांसमोर आला आहे. राहुल गांधी यांनी पत्र आणि एक्सवरील पोस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या पत्राला आणि पोस्टला काय उत्तर देणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
ADVERTISEMENT












