महिलांनी स्वतंत्र न राहण्याचा मनस्मृतीचा डाव - राहुल गांधी

मुंबई तक

22 Aug 2026 (अपडेटेड: 22 Aug 2026, 08:56 PM)

Rahul Gandhi : मनुस्मृती स्त्रियांबाबत चुकीचा अर्थ लावते. स्त्रिया खूप अधिक खास आहेत, स्त्रियांची ओळख ही त्यांची स्वत:ची ओळख असते. तुम्ही सर्व आपापल्या परीने अधिकच स्पेशल आहात,' असं राहुल गांधी यांनी मनुस्मृतीवर भाष्य केलं.

Rahul Gandhi

Rahul Gandhi

Google CTA

बातम्या हायलाइट

point

'छात्रों की गूंज' या कार्यक्रमात मनुस्मृतीवरून राहुल गांधी काय म्हणाले? 

point

'100 पैकी सहा महिलांवर अत्याचार'

Rahul Gandhi : 'मनुस्मृतीतून महिलांबाबत चुकीची व्याख्या करण्यात आली. स्त्रियांना त्यांचे स्वतंत्र मिळू नये असा त्यांचा डाव आहे. मनुस्मृती स्त्रियांबाबत चुकीचा अर्थ लावते. स्त्रिया खूप अधिक खास आहेत, स्त्रियांची एक स्वत:ची वेगळी ओळख आहे. तुम्ही सर्व आपापल्या परीने अधिकच स्पेशल आहात,' असं राहुल गांधी यांनी मनुस्मृतीवर भाष्य केलं. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगरात मुलासह वडिलांची 300 फूट खोल दरीत उडी, आईनं पाहिलं अन्..

'छात्रों की गूंज' या कार्यक्रमात मनुस्मृतीवरून राहुल गांधी काय म्हणाले? 

पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या 'छात्रों की गूंज' या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं तरुण आणि विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती दर्शविली होती. राहुल गांधींनी त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात मनुस्मृतीचा दाखला देत महिलांबाबत केलेल्या चुकीच्या व्याख्येवरून उपस्थित तरुणांना संबोधित केले. '70 कोटी महिलांना अनोखा प्रवास आणि त्या जगत असलेली अनोखी स्वप्ने हीच भारताची सर्वात मोठी ताकद आहे. महिला या पुरूषांहून अधिक संवेदनशील, सौम्य, दयाळू आणि पुरोगामी विचारांच्या असतात,' असे राहुल गांधी म्हणाले. 

राहुल गांधी म्हणाले की, 'इथे राजकारणावर बोलण्यास आलो नाही. शिक्षणात मुलींसोबत सातत्याने भेदभाव केला जातोय. तरुणांची लोकसंख्या ही भारताची सर्वाधिक मोठी ताकद आहे', असे राहुल गांधी म्हणाले. अशातच काही विद्यार्थींनींनी आपल्यासोबत घडलेला अनुभव देखील सांगितला. शिक्षण घेताना, नोकरीसाठी येणाऱ्या अडचणींचा सामना कसा केला जातो, असे अनेक अनुभव विद्यार्थींनी राहुल गांधीसमोर सांगितला.

हे ही वाचा : शौचासाठी गेलेल्या महिलेचा मृतदेह विहिरीत, नवऱ्याला बलात्काराचा संशय

'100 पैकी सहा महिलांवर अत्याचार'

यावेळी काही विद्यार्थींनींनी मुलींवर येणाऱ्या मोठ्या बंधनाबाबतचा अनुभव सांगितला. अशातच राहुल गांधी यांनी दररोज 100 पैकी सहा महिलांवर अत्याचार होत आहेत. प्रत्येकी वर्षाला साडे चार लाख स्त्रीभ्रूण हत्या केली जात आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी मनस्मृतीवर भाष्य केले.