धनुष्यबाण चिन्ह गोठवलं तर, कोणाला फायदा? आंबेडकरांचं मोठं विधान

मुंबई तक

21 Aug 2026 (अपडेटेड: 21 Aug 2026, 09:32 AM)

Prakash Ambedkar on shivsena party symbol : शिवसेनेच्या पक्षचिन्हावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवर वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका मांडली आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवले जाण्याची शक्यता अधिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Prakash Ambedkar on shivsena party symbol

Prakash Ambedkar on shivsena party symbol

Google CTA

बातम्या हायलाइट

point

धनुष्यबाण चिन्ह गोठवलं तर, कोणाला फायदा?

point

प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

Prakash Ambedkar on Shiv Sena Supreme Court Hearing : शिवसेनेच्या पक्षचिन्हाची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कोणाला मिळणार आणि मूळ शिवसेना कोणाची, यावर या सुनावणीत युक्तिवाद सुरू आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा पुढे काय निकाल लागू शकतो आणि त्याचा कोणाला फायदा होईल, याबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका मांडली आहे. त्यांच्या मते, या संपूर्ण प्रकरणाचा फायदा भारतीय जनता पक्ष आणि अमित शाह यांना होण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : नऊ वर्षांच्या मुलीवर भावासमोर लैंगिक अत्याचार, अखेर कुटुंबीयांना सांगितला घटनेचा थरार

"भाजपला वेगळी फोडाफोड करण्याची गरज पडणार नाही"

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, या प्रकरणाचा परिणाम असा होऊ शकतो की दोन्ही खासदार भाजपमध्ये जाऊ शकतात. त्यामुळे भाजपला वेगळी फोडाफोड करण्याची गरज पडणार नाही, असे त्यांनी म्हटले. शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये सुरू असलेल्या या वादातून नेमका कोणाला फायदा होईल, याबाबत विचारले असता त्यांनी थेट भाजप आणि अमित शाह यांचा उल्लेख केला. या प्रकरणाचा पुढील परिणाम पाहता भाजपसाठी परिस्थिती अनुकूल होऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : शिंदेंच्या हातून धनुष्यबाण सुटणार की राहणार? सुप्रीम कोर्टातील सुनावणी जशीच्या तशी

सिव्हिल वाद सिव्हिल कोर्टातच सोडवले जाणे अपेक्षित - आंबेडकर 

पक्षचिन्हाच्या निर्णयाबाबत बोलताना आंबेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या मते, सुरुवातीलाच हे प्रकरण सिव्हिल कोर्टाच्या अधिकारक्षेत्रात येते की नाही, हे स्पष्ट व्हायला हवे होते. रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स अॅक्टच्या कलम 29 एचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, राजकीय पक्षांचे रजिस्ट्रेशन सक्तीचे झाल्यानंतर या प्रकरणाकडे वेगळ्या पद्धतीने पाहण्याची गरज होती. त्यांच्या मते, सिव्हिल वाद सिव्हिल कोर्टातच सोडवले जाणे अपेक्षित आहे. मात्र, निवडणूक आयोगाने या प्रकरणात निर्णय दिला आणि नंतर सर्वोच्च न्यायालयानेही त्याला योग्य ठरवले, असे त्यांनी म्हटले.

आंबेडकर यांनी काँग्रेसमधील जुन्या वादाचाही संदर्भ दिला. त्या वेळी संबंधित संघटना अनरजिस्टर्ड असल्यामुळे निवडणूक आयोगाला निर्णय देण्याचा अधिकार असल्याचे न्यायालयाने मानले होते. मात्र, राजकीय पक्षांचे रजिस्ट्रेशन सक्तीचे झाल्यानंतर परिस्थिती बदलली, असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे पक्षचिन्ह देण्याचे अधिकार आहेत की नाही, याबाबत सर्वोच्च न्यायालयासमोर आता संभ्रम असल्याचे त्यांना वाटते. याच कारणामुळे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले जाण्याची शक्यता अधिक असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते, या संपूर्ण प्रकरणात सिव्हिल कोर्ट आणि निवडणूक आयोगाच्या अधिकारक्षेत्राबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट भूमिका घेणे आवश्यक आहे.