मनोज जरांगेंचा तगडा डाव, समाजाच्या मागण्यांसाठी मुंबईत एल्गार? तारीख ठरली

मुंबई तक

19 Aug 2026 (अपडेटेड: 19 Aug 2026, 11:27 AM)

Manoj Jarange Patil : मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी 29 ऑगस्टला आझाद मैदानावर आंदोलन करण्याची तयारी सुरू झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिनिधींनी आंदोलनासाठी मुंबई पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे.

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मनोज जरांगेंचा तगडा डाव,

point

समाजाच्या मागण्यांसाठी मुंबईत एल्गार? तारीख ठरली

Manoj Jarange Patil Mumbai Protest : मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याची तयारी सुरू झाली आहे. 29 ऑगस्ट रोजी आंदोलन, उपोषण आणि धरणे आंदोलन करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे अधिकृत परवानगी मागण्यात आली आहे. जरांगे पाटील यांचे अधिकृत प्रतिनिधी गंगाधर काळकुटे यांनी 17 ऑगस्ट रोजी मुंबई पोलीस आयुक्त आणि आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे यासंदर्भात निवेदन सादर केले आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : बीड : महिलेचे बाळंतपण झाले, पण डॉक्टर पोटातच विसरले हातमोजे अन् रुमाल; पुढं काय घडलं?

मनोज जरांगेंच्या प्रतिनिधींकडून निवेदन सादर 

मराठा समाजाच्या न्याय्य आणि प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानावर हे आंदोलन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 29 ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत आंदोलन करण्याचे नियोजन असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हे आंदोलन शांततेच्या आणि लोकशाही मार्गाने करण्यात येणार असून, पूर्णपणे घटनात्मक चौकटीत आंदोलन केले जाईल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात पावसाची संथ स्थिती, तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट

कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग होणार नाही, आंदोलकांची पोलिसांना ग्वाही 

आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग होणार नाही, याची आयोजकांकडून दक्षता घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आंदोलनात सहभागी होणाऱ्यांची अंदाजे संख्या, वाहनांचा तपशील, स्वयंसेवकांची यादी आणि त्यांचे संपर्क क्रमांक, तसेच फलक, बॅनर आणि ध्वजांचा तपशील पोलीस प्रशासनाकडे विहित नमुन्यात सादर करण्यात येणार आहे. तसेच आंदोलनामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही आणि सार्वजनिक शांतता अबाधित राखली जाईल, अशी हमी आयोजकांनी दिली आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 33 अन्वये अधिसूचित नियम तसेच पोलीस प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सर्व सूचना आणि निर्देशांचे पालन करण्याचे आश्वासनही निवेदनातून देण्यात आले आहे. दरम्यान, आझाद मैदानावर आंदोलन, उपोषण आणि धरणे करण्यासाठी आवश्यक ती रीतसर परवानगी द्यावी, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांचे अधिकृत प्रतिनिधी गंगाधर काळकुटे यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.