'भाषा संपते तेव्हा संपूर्ण संस्कृती संपते, विचारही संपतो..', पाहा अभिजात मराठी भाषेच्या कार्यक्रमात फडणवीस काय-काय म्हणाले!

मुंबई तक

• 04:41 PM • 03 Oct 2026

मुंबईत अभिजात मराठी भाषा सप्ताह 2026 चा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषेच्या थोरवीविषयी भाष्य केले. ते नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊया.

 Devendra Fadnavis On Marathi Language

Devendra Fadnavis On Marathi Language

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

'भाषा संपते तेव्हा संपूर्ण संस्कृती संपते, विचारही संपतो'

point

अभिजात मराठी भाषेच्या कार्यक्रमात फडणवीस काय-काय म्हणाले!

मुंबई : अभिजात मराठी भाषा सप्ताह 2026 चा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत (3 ऑक्टोबर) पार पडला. यावेळी बोलताना त्यांनी मराठी भाषेची थोरवी, तिचा इतिहास आणि तिचे सांस्कृतिक महत्त्व यावर भाष्य केले. ते म्हणाले की, 'जेव्हा भाषा संपते, त्यावेळी एक संपूर्ण संस्कृती संपते. एक संपूर्ण विचार संपतो. एक सभ्यता संपते. एक व्यवस्था संपते. म्हणून भाषा ही अत्यंत महत्त्वाची असते.' मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला तो दिवस म्हणजे 3 ऑक्टोबर हा आता 'अभिजात मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा केला जाणार आहे.

हे वाचलं का?

'भाषा संपते, तेव्हा संस्कृती संपते'

भाषेचे महत्त्व सांगताना फडणवीस म्हणाले की, 'भाषा केवळ संपर्काचं माध्यम नाही. संपर्क आणि संवादाकरता तर भाषा आहेच; पण आपल्या संस्कृतीची वाहक देखील भाषा आहे. आपल्या इतिहासाची साक्ष देखील आपली भाषा आहे. म्हणून ज्यावेळेस भाषा संपते, त्यावेळी एक संपूर्ण संस्कृती संपते. एक संपूर्ण विचार संपतो. एक सभ्यता संपते. एक व्यवस्था संपते. म्हणून भाषा ही अत्यंत महत्त्वाची असते.'

हे ही वाचा  : Asian Games: पाकिस्तानला पुन्हा धूळ चारली! टीम इंडियाने मिळवलं Gold, अभिषेक-तिलकची तुफानी खेळी!

'समतेचं बीजारोपणही मायमराठीत'

महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सामाजिक जडणघडणीत मायमराठीच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, 'छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते लोकमान्य टिळकांपर्यंत सर्वांनीच स्वराज्याची भूमिका मराठी भाषेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली. महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, आगरकर, गोखले यांनी सुधारणांच्या माध्यमातून समाजात एक नवीन विचार रुजवला. तो विचार रुजवत असताना विचारांचा पायादेखील आपल्या मायमराठीच्या माध्यमातून रुजवला. छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजात समतेचं बीजारोपण करताना त्यांची भाषादेखील आपली मायमराठी होती. ही आपल्या सर्वांकरिता अभिमानाची आणि स्वाभिमानाची बाब आहे.' 

हे ही वाचा : Govt Jobs : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! 2008 जागांची भरती जाहीर, 'या' तारखेपूर्वी करा अर्ज

13 लाख शब्दांनी समृद्ध मायमराठी

मराठी भाषेच्या शब्दसमृद्धीचा दाखला देत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 'विसाव्या शतकात तयार झालेल्या मराठी ज्ञानकोश आणि मराठी शब्दरत्नाकर यांमध्ये तब्बल 11 लाख ते 13 लाख शब्द पाहायला मिळतात. याउलट, इंग्रजीसाठी प्रमाण मानल्या जाणाऱ्या ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये सहा लाख शब्द असून मँडरिन, स्पॅनिश आणि फ्रेंच यांसारख्या प्रमुख जागतिक भाषांमध्ये प्रत्येकी केवळ तीन ते साडेतीन लाख शब्द आढळतात. इतर भाषांच्या तुलनेत 13 लाख शब्द असणारी आपली मायमराठी अत्यंत समृद्ध भाषा आहे.'