Govt Jobs : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! 2008 जागांची भरती जाहीर, 'या' तारखेपूर्वी करा अर्ज
रेल्वेमध्ये नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 6 नोव्हेंबर आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी
2008 जागांची भरती जाहीर
'या' तारखेपूर्वी करा अर्ज
Railway Recruitment : रेल्वेमध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. उत्तर पश्चिम रेल्वेने (NWR) अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या तब्बल 2008 जागांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे फिटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, कारपेंटर, डिझेल मेकॅनिक, मशीनिस्ट आणि कॉम्प्युटर ऑपरेटर यांसारख्या विविध तांत्रिक ट्रेडमध्ये प्रशिक्षणार्थी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे.
शैक्षणिक पात्रता काय?
या भरतीसाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता 50% गुणांसह दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. वयोमर्यादेचा विचार करता उमेदवारांचे वय 15 ते 24 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. शासकीय नियमांनुसार अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना 3 वर्षांची वयोमर्यादा सूट देण्यात आली आहे.
हे ही वाचा : नागपूर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय, नवऱ्याने बायकोला संपवलं; पोस्टमार्टम रिपोर्टमधून 'ते' कारण समोर
अर्जाची शेवटची तारीख
या भरतीसाठी 7 ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू होत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2026 आहे. अर्जासाठी सामान्य आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल, तर महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही. निवड प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेवर (Merit List) आधारित असेल; ज्यामध्ये उमेदवाराचे दहावीतील टक्के आणि ITI चे गुण एकत्रित करून गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
हे ही वाचा : MPSC च्या वर्तुळात काय सुरू आहे? रोहित पवारांनी काय सांगितलं?
'इथे' करा अर्ज
अर्ज करण्यासाठी आणि या भरतीसंबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला (nwr.indianrailways.gov.in) भेट द्यावी. नुकतंच शिक्षण पूर्ण करुन अप्रेंटिसच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची संधी आहे.
