Asian Games: पाकिस्तानला पुन्हा धूळ चारली! टीम इंडियाने मिळवलं Gold, अभिषेक-तिलकची तुफानी खेळी!

मुंबई तक

भारताने एशियन गेम्स 2026 च्या पुरुष क्रिकेट फायनलमध्ये पाकिस्तानचा 19 धावांनी पराभव करून सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदकावर नाव कोरले.

ADVERTISEMENT

india vs pakistan cricket match asian games 2026 final india wins gold medal
Asian Games Team India gold medal
Google CTA

निशिन (जपान): एशियन गेम्स 2026 च्या पुरुष क्रिकेट फायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा 19 धावांनी पराभव करत सुवर्णपदकावर पुन्हा एकदा आपले नाव कोरले. 3 ऑक्टोबर रोजी निशिनच्या कोरोगी स्पोर्ट्स पार्कमध्ये झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 6 विकेट गमावत 211 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 192 धावांपर्यंतच मजल मारू शकला. या विजयासह भारताने एशियन गेम्समधील पुरुष क्रिकेटचे सुवर्णपदक सलग दुसऱ्यांदा जिंकले.

भारताची दमदार सुरुवात

भारताकडून वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा यांनी डावाची आक्रमक सुरुवात केली. वैभवने 9 चेंडूत 15 धावा केल्या. त्याच्या खेळीत दोन षटकारांचा समावेश होता. मात्र, त्यानंतर संजू सॅमसन केवळ 2 धावांवर बाद झाला.

अभिषेक शर्माने मात्र आक्रमक फलंदाजी कायम ठेवत अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने 28 चेंडूंत 61 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 7 षटकार ठोकले. त्याचा स्ट्राइक रेट 217 पेक्षा अधिक होता.

अखेरच्या षटकांत भारताकडून धावांची बरसात

मधल्या षटकांमध्ये भारताच्या धावांचा वेग काहीसा मंदावला होता. अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर 7.5 षटकांत भारताची धावसंख्या 93 धावांवर 3 विकेट अशी होती. श्रेयस अय्यर बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या 14.1 षटकांत 133/5 अशी होती.