Rahul Gandhi pune students event kiss viral video : पुण्यात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका विद्यार्थिनीने राहुल गांधी यांच्या गालावर सरप्राईज किस केल्याचे दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये राहुल गांधी मंचावर उपस्थित असलेल्या लोकांसोबत सेल्फी घेताना दिसत आहेत. याचवेळी एक तरुण विद्यार्थिनी त्यांच्याजवळ येते. सेल्फी घेतल्यानंतर ती अचानक राहुल गांधी यांच्या गालावर किस करते. यानंतर राहुल गांधी काही क्षण तिच्याशी संवाद साधतात. त्यानंतर ते आपल्या सुरक्षारक्षकांसोबत मंचावरून खाली जातात. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर झाल्यानंतर व्हायरल झाला.
ADVERTISEMENT
हेही वाचा : कुणाल चांदगुडेच्या मावशीचा संताप, सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून केली 'ती' विनंती
‘क्यूट मोमेंट’, राहुल गांधींना विद्यार्थिनीकडून सरप्राईज किस
‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाच्या ठिकाणी कॉन्सर्टसारखी रोषणाई आणि मोठ्या संख्येने तरुणांची उपस्थितीही व्हिडिओमध्ये दिसत आहे. या घटनेवर सोशल मीडिया यूजर्सकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यात आल्या. काहींनी या घटनेचा संबंध विद्यार्थिनीच्या आत्मविश्वासाशी आणि राहुल गांधी यांच्याप्रती तिच्या सहजतेशी जोडला, तर काहींनी याला ‘क्यूट मोमेंट’ म्हटले.
हेही वाचा : इथेनॉलवर जडला जीव, पण साखरेने केला गेम! मोदी सरकार साखर स्वस्त करणार की नाही?
राहुल गांधींचा ‘मनुस्मृती मानसिकते’वर निशाणा
राहुल गांधी यांचा पुणे दौरा केवळ या व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत राहिला नाही. ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात त्यांनी महिला, युवक आणि सामाजिक व्यवस्थेशी संबंधित मुद्द्यांवरही भाष्य केले. त्यांनी ‘मनुस्मृती मानसिकते’वर निशाणा साधला. तसेच महिलांनी पितृसत्तेविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात राहुल गांधी यांनी जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाचाही उल्लेख केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्या वक्तव्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला.
भाजप नेते केशव उपाध्ये यांनी राहुल गांधी यांच्या कार्यक्रमावर प्रश्न उपस्थित केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या वास्तविक प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी सामान्य राजकीय वक्तव्ये करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच गर्दी जमवण्यासाठी कॉलेजच्या बसचा वापर करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. याला काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी प्रत्युत्तर दिले. प्रशासनाकडून अडचणी निर्माण करूनही राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला युवकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा त्यांनी केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील Gen Z कार्यक्रमावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
ADVERTISEMENT












