शाळेची चौकशी भोवली.. अभिजीत दीपकेंवर FIR, काय घडलं लातूरमध्ये?

मुंबई तक

• 10:10 AM • 24 Aug 2026

Latur police fir abhijeet dipke cjp school trespassing case : लातूर जिल्ह्यातील सरकारी शाळेत विनापरवानगी प्रवेश केल्याचा आरोप CJP संस्थापक अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणणे आणि शिक्षकांना धमकावल्याच्या आरोपांवरून औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latur police fir abhijeet dipke cjp school trespassing case

Latur police fir abhijeet dipke cjp school trespassing case

Google CTA

बातम्या हायलाइट

point

शाळेची चौकशी भोवली..

point

अभिजीत दीपकेंवर FIR, काय घडलं लातूरमध्ये?

Latur police fir abhijeet dipke cjp school trespassing case : लातूर जिल्ह्यात कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी शाळेत विनापरवानगी प्रवेश करणे, सरकारी कामात अडथळा आणणे आणि शिक्षकांना धमकावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी जिल्हा परिषद उर्दू शाळेतील 53 वर्षीय शिक्षिका सैयद शमशादबानो खैरात अली यांच्या तक्रारीवरून औसा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दिपके हे CJPच्या सुरू असलेल्या ‘स्कूल ठीक करो’ अभियानाअंतर्गत मध्य महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील शाळांना भेटी देत असून, तेथील समस्या समोर आणत आहेत.

हे वाचलं का?

हेही वाचा : आधी महिलेवर बलात्कार नंतर श्वासनलिका कापून केली हत्या, 'त्या' दोन महिलांसोबत काय घडलं?

लातूर जिल्ह्यातील औसाजवळील जावळी येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत दिपकेंनी भेट दिल्यानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोणतीही परवानगी न घेता शाळेत प्रवेश केल्याचा आरोप आहे. त्यानंतर ते विद्यार्थ्यांमध्ये जाऊन बसले आणि त्यांना अनेक प्रश्न विचारले. या प्रकारामुळे शाळेतील शिक्षण आणि सरकारी कामात अडथळा निर्माण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा : महाराष्ट्र हळहळला, नवजात बालकांच्या ICU मध्ये व्हेंटिलेटरचा स्फोट, 3 बाळांचा मृत्यू

तक्रारीत CJP नेत्याने या संपूर्ण प्रकाराचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याचा आणि ते सोशल मीडियावर शेअर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिपके यांनी त्यांच्या दौऱ्यादरम्यान दुसऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना वर्गात आणून बसवण्यात आल्याचा दावा करून संबंधित शाळेची बदनामी केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच शिक्षकांना निलंबित करण्याची धमकी दिल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे सरकारी शाळेतील कामकाजात अडथळा आणल्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 132, 329(3), 351(2) आणि 356(2) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सरकारी शाळेत विनापरवानगी प्रवेश, सरकारी कामात अडथळा आणि शिक्षकांना धमकावल्याच्या आरोपांवरून ही कारवाई करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.