मोदींच्या 'त्या' इंस्टाग्राम व्हिडीओवरुन राहुल गांधींची टीका, मुलींना पितृसत्ता मोडून काढण्याचे आवाहन

मुंबई तक

23 Aug 2026 (अपडेटेड: 23 Aug 2026, 09:50 AM)

'छात्रों की गूंज' या कार्यक्रमात, परीक्षा आणि आदिवासींच्या समस्यांबाबत विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतानाच, राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींच्या विधानाकडे पितृसत्ताक आणि 'मनुस्मृती'च्या व्यापक मानसिकतेचा एक भाग म्हणून पाहिले.

Rahul Gandhi On Narendra  Modi

Rahul Gandhi On Narendra  Modi

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मोदींच्या 'त्या' इंस्टाग्राम व्हिडीओवर राहुल गांधींची टीका

point

मुलींना पितृसत्ता मोडून काढण्याचे आवाहन

Rahul Gandhi On Narendra  Modi : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी (22 ऑगस्ट) केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. 'छात्रों की गूंज' या विद्यार्थी संवाद कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी समाजात पसरलेल्या "मनुस्मृती मानसिकतेवर" टीका केली आणि विद्यार्थिनींना पितृसत्ता मोडून काढण्याचे आवाहन केले.

हे वाचलं का?

मुलांनी शिवीगाळ केली तर चालते, पण...

जंतरमंतरवर पार पडलेल्या पेपर लीकविरोधी आंदोलनादरम्यान विद्यार्थिनींनी शिवीगाळ केल्याचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींनी सांस्कृतिक धक्का बसल्याचे विधान केले होते. यावर प्रत्युत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, "आंदोलनात मुलं आणि मुली दोघांनीही घोषणाबाजी व भाषेचा वापर केला होता. मात्र, पंतप्रधानांनी केवळ मुलींच्या भाषेवर बोट ठेवले. मुलांनी शिवीगाळ केली तर चालते, पण मुलींनी केले की तो सांस्कृतिक धक्का ठरतो, ही मानसिकता चुकीची आहे." मुलांवर कोणतेही बंधन नसणे आणि मुलींना घरात बंदिस्त ठेवणे हीच मनुस्मृतीची मानसिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा : महिलांनी स्वतंत्र न राहण्याचा मनस्मृतीचा डाव - राहुल गांधी

70 कोटी महिलांची स्वप्ने

राहुल गांधी यांनी मनुस्मृतीतील एका श्लोकाचा संदर्भ देत सांगितले की, महिलांनी बालपणी वडिलांचे, तारुण्यात पतीचे आणि वृद्धापकाळात मुलांचे ऐकले पाहिजे, ही विचारसरणी अत्यंत लज्जास्पद आहे. महिला कोणाचीही मालमत्ता नसून त्या स्वतःच्या मालक आहेत. मुलगी, पत्नी किंवा आई असणे ही स्त्रीची एकमेव ओळख असू शकत नाही. देशातील 70 कोटी महिलांची स्वतंत्र स्वप्ने आणि क्षमता हीच भारताची खरी ताकद आहे.

हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगरात मुलासह वडिलांची 300 फूट खोल दरीत उडी, आईनं पाहिलं अन्..

आपल्या हक्कांसाठी खंबीरपणे उभे रहा

आपल्या भाषणात त्यांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या जुन्या विधानांचा दाखला देत, भाजप आणि संघाच्या विचारसरणीवर हल्ला चढवला. समाजात महिलांवर होणारे अत्याचार, आर्थिक विषमता आणि भेदभावाची आकडेवारी मांडत राहुल गांधींनी महिलांना आपल्या हक्कासाठी स्पष्ट आणि खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.