कुणालने उडी मारली तेव्हा काय घडलं? प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले?

मुंबई तक

26 Aug 2026 (अपडेटेड: 26 Aug 2026, 08:51 AM)

kunal chandgude case : कुणाल चांदगुडेने टेकडीवरून उडी मारल्यानंतर नेमकं काय घडलं, याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. बचाव पथकाने तीन तास प्रयत्न करूनही कुणालला वाचवता आलं नाही.

kunal chandgude case

kunal chandgude case

Google CTA

बातम्या हायलाइट

point

कुणालने उडी मारली तेव्हा काय घडलं?

point

प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले?

kunal chandgude case : छत्रपती संभाजीनगरमध्ये कुणाल चांदगुडे या तरुणाने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या त्याच्या वडिलांचाही टेकडीवरून पडून मृत्यू झाला. त्यानंतर हा धक्का सहन न झाल्याने कुणालच्या आईनेही खाली उडी घेतली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी नेमकं काय घडलं, याबाबत माहिती दिली.

हे वाचलं का?

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर प्रकरण : मुरलीधर चांदगुडे काम करत होते, तिथल्या लोकांनी काय खुलासे केले?

तब्बल तीन तास आईचा समजावण्याचा प्रयत्न

प्रत्यक्षदर्शीने सांगितल्यानुसार, कुणाल टेकडीवरील एका ठिकाणी उभा राहून उडी मारण्याच्या तयारीत होता. पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले होते. कुणालची आई त्याच्याशी संवाद साधत होती आणि त्याला खाली येण्याची विनंती करत होती. तब्बल तीन तास ती त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, कुणाल वारंवार आपली उभे राहण्याची जागा बदलत होता. त्यामुळे बचाव पथक ज्या ठिकाणी जंपिंग शीट लावत होते, त्या ठिकाणी तो पडण्याची शक्यता राहिली नाही. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, कुणालच्या मनात काहीतरी होतं आणि तो डिप्रेशनमध्ये गेला असल्याचं सांगण्यात आलं.

हेही वाचा : कल्याण : पेशंटच्या मुलाची डॉक्टरला मारहाण, फरार आरोपीचा शोध सुरु; नेमकं काय घडलं?

आईला वाचवताना कर्मचाऱ्यांना दुखापत 

घटनास्थळी पोहोचलेल्या बचाव पथकातील कर्मचाऱ्याने सांगितलं की, रात्री 11 वाजून 33 मिनिटांनी त्यांना फोन आला आणि त्यानंतर संपूर्ण टीम घटनास्थळी रवाना झाली. पथकाने जाळी आणि जंपिंग शीट लावून बचावकार्य सुरू केलं. मात्र, कुणाल वरच्या बाजूला असल्याने तो खालील पथकाला व्यवस्थित दिसत नव्हता. कुणालने उडी मारल्यानंतर तो थेट खाली असलेल्या दगडांवर पडला आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर काही सेकंदांतच त्याच्या आईनेही उडी घेतली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात एका फायरमनला दुखापत झाली, तर बचाव पथकातील कर्मचाऱ्याच्या हाताच्या बोटाला फ्रॅक्चर झालं.

प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, कुणालची आणि त्याच्या कुटुंबाची प्रतिमा चांगली होती. ते मागील चार महिन्यांपासून परिसरात राहत होते आणि त्यांच्या वागणुकीबाबत शेजाऱ्यांकडून कोणतीही तक्रार नव्हती. कुणाल अभ्यासात चांगला होता आणि एमबीबीएसचं शिक्षण घेत होता. त्याला डॉक्टर व्हायचं होतं. तो कोणाशी भांडण करणारा किंवा रागीट स्वभावाचा नव्हता, असंही प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. कुणालच्या आईला सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्याचा फोन आला होता. त्यावेळी त्याने आत्महत्या करत असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर त्याची आई घटनास्थळी गेली आणि पुढे त्याचे वडीलही तिथे पोहोचले. कुटुंबात काही मोठा वाद नव्हता, केवळ पती-पत्नीमध्ये नेहमीप्रमाणे होणारे किरकोळ वाद असल्याचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.