"डरपोक लोकं, कुठेतरी लपून बसतात..", टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री काय म्हणाले?

योगेश पांडे

• 10:41 AM • 19 Oct 2026

Devendra Fadnavis statement tiger shroff firing case : अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. आरोपींना शोधून काढणार, तसेच त्यांच्या पाठीशी कोण आहे, याचाही तपास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis statement

Devendra Fadnavis statement

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

"डरपोक लोकं, कुठेतरी लपून बसतात.."

point

टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री काय म्हणाले?

Devendra Fadnavis statement tiger shroff firing case, नागपूर : मुंबईतील जुहू परिसरात अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना रविवारी (दि.18)रात्री घडली. दरम्यान, टायगर श्रॉफ सुरक्षित असून, त्याला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी टायगरच्या गाडीवर गोळीबार केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली. "हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचे सांगत त्यांनी पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केल्याची माहिती दिली. या प्रकरणातील आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला असून, आरोपींना कोणत्याही परिस्थितीत शोधून काढले जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच या आरोपींच्या पाठीशी कोण आहे, याचाही शोध घेतला जाईल", असेही ते म्हणाले.

हे वाचलं का?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "या घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे. रात्रीतूनच आरोपींबाबत काही धागेदोरे पोलिसांना मिळाले असून, त्यांच्या आधारे तपास सुरू आहे. मागील वेळीही अशा प्रकारचा प्रयत्न झाला होता, तेव्हा मुंबई पोलिसांनी आरोपींना शोधून काढले होते. त्यांच्यामागे असलेल्या व्यक्तींचाही शोध घेण्यात आला होता. अशा प्रकारच्या घटना कोणत्याही परिस्थितीत सहन केल्या जाणार नाहीत", असा इशाराही त्यांनी दिला. 

"पोलिसांना उघडपणे चॅलेंज कोणी देऊ शकत नाही. हे डरपोक लोक आहेत. हे कुठेतरी लपून बसतात आणि तिथून अशा प्रकारच्या वल्गना करतात. यांच्यात हिंमत नाही. या टोळ्या भाड्याने घेतलेल्या लोकांच्या माध्यमातून काम करतात. हे लोक महाराष्ट्राबाहेरून किंवा देशाबाहेरून कारवाया करत असल्याचे तपासात समोर आल्यास संबंधित यंत्रणांच्या मदतीने त्यांचे जाळे उद्ध्वस्त केले जाईल", असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर वडील जॅकी श्रॉफ यांची प्रतिक्रिया आली समोर, नेमकं काय म्हणाले?

टायगर श्रॉफला देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन 

टायगर श्रॉफच्या सुरक्षेबाबतही मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. "टायगर श्रॉफ यांच्याशी आपले बोलणे झाले असून, त्यांना चिंता करू नये, असे आश्वासन दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले. "ज्यांनी हे केलंय, त्यांना आम्ही शोधून काढणार आणि त्यांना पूर्णपणे सुरक्षित ठेवणार आहोत. मुंबई पोलीस प्रोफेशनल पद्धतीने काम करतात आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारांना पकडण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे" असेही फडणवीसांनी सांगितले. 

या घटनेत टायगर श्रॉफचा चालक आणि एक प्रत्यक्षदर्शी जखमी झाले असून, त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुष्पा पार्कजवळ ही घटना घडली. टायगर श्रॉफ सुरक्षित असल्याची माहिती त्याचे वडील आणि अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या टीमने दिली आहे. पोलिसांनीही टायगरला गंभीर दुखापत झालेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. गोळीबाराच्या वेळी गाडीत नेमके काय घडले, याचा तपास सुरू आहे.

पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेलाही उत्तर दिले. विरोधकांनी टीका करण्यापूर्वी त्यांच्या काळातील घटनांकडेही पाहावे. त्यांच्या काळात देशातील एका मोठ्या उद्योगपतीच्या घरासमोर बॉम्ब ठेवण्यात आला होता. तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरण, बदल्यांमधील कथित घोटाळे आणि दूरध्वनी संभाषणांच्या नोंदींचाही त्यांनी उल्लेख केला.