Lok Sabha Election 2024: BJP चा मोठा निर्णय, पूनम महाजनांचं तिकीट कापलं.. उज्ज्वल निकमांना उमेदवारी!
Ujjwal Nikam: लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपने उत्तर मध्य मुंबई या मतदारासंघासाठी पूनम महाजन यांचं तिकीट कापून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केलं आहे.
ADVERTISEMENT

Ujjwal Nikam BJP Candidate: नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) साठी भाजपने (BJP) उत्तर मध्य मुंबई (Mumbai North-Central) या मतदारासंघासाठी आज (27 एप्रिल) उमेदवाराची घोषणा केली. ज्यामध्ये त्यांनी ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना तिकीट जाहीर केलं आहे. याचाच अर्थ भाजपने येथील विद्यमान खासदार पूनम महाजन (Poonam Mahajan) यांचं तिकीट कापलं आहे. (lok sabha election 2024 bjp took big decision famous lawyer ujjwal nikam will be the bjp candidate from mumbai north central seat poonam mahajan ticket canceled)
भाजपचं 'मिशन 400' वर लक्ष केंद्रित केलं आहे.. त्यामुळेच आपला प्रत्येक उमेदवार हा अत्यंत पारखून देण्यावर भाजपचा भर आहे. त्यामुळेच तब्बल दोन वेळा खासदार असलेल्या पूनम महाजन यांचं तिकीट कापून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी या मुबंई उत्तर-मध्य मतदारसंघातून निवडणुकीसाठी उतरविण्यात आलं आहे.
यामुळे आता मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड अशी थेट लढत असणार आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना तिकीट जाहीर केलं होतं. त्यामुळे तेवढ्याच तुल्यबळ उमेदवाराच्या शोधात भाजप होतं. अखेर भाजपने पूनम महाजन यांना डावलत उज्ज्वल निकमांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.
याआधी भाजपने याच जागेसाठी अभिनेत्री माधुरी दीक्षितशी संपर्क साधला होता अशीही चर्चा होती. दुसरीकडे भाजप आमदार आशिष शेलार यांनी या जागेवरून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. पण या सगळ्यांना मागे टाकत उज्ज्वल निकम यांनी बाजी मारली आहे.










