Pune: कुख्यात गुंड निलेश घायवाळला कानाखाली मारलेली, 'त्या' पैलवानाचा पुण्यात Murder

मुंबई तक

16 Mar 2026 (अपडेटेड: 17 Mar 2026, 02:15 AM)

Pune Crime : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवाळला कानशि‍लात लगावणारा पैलवान सागर मोहोळकरचा पुण्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. 9 मार्च रोजी जामखेडमध्ये सागर मोहोळकरवर गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारानंतर तो गंभीर जखमी झाला, त्यानंतर त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

Pune Crime

Pune Crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

निलेश घायवाळला कानशि‍लात लगावणारा पैलवान सागर मोहोळकर मृत्यू

point

पैलवान सागर मोहोळकरवर गोळीबार

Pune Crime : आदित्य भावार - पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवाळला कानशि‍लात लगावणारा पैलवान सागर मोहोळकरचा पुण्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. 9 मार्च रोजी जामखेडमध्ये सागर मोहोळकरवर गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारानंतर तो गंभीर जखमी झाला, त्यानंतर त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'बारामतीत सुनेत्रा पवारांविरोधात..', सुप्रिया सुळेंची मोठी घोषणा; राहुरीच्या पोट-निवडणुकीबाबतही भाष्य

पैलवान सागर मोहोळकरवर गोळीबार

सागर मोहोळकरने जामखेड येथे कुख्यात गुंड निलेश घायवाळच्या कानशि‍लात लगावली होती. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अहिल्यानगरच्या जमाखेडमध्ये पैलवान सागर मोहोळकरवर गोळीबार झाल्याची घटना 9 मार्च रोजी घडली होती.

मोहोळकरवर गोळीबार झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाल्याचं चित्र आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकाला पुण्यातून ताब्यात घेण्यात आलं. आरोपी हा सध्या पुण्याचाच रहिवासी आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे ही वाचा : नागपूर हादरलं! पेपरचं कारण देऊन मुलगा घरातून निघाला, एम्प्रेस मॉलच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारत संपवलं जीवन

पैलवान सागर मोहोळकरवर फायरिंग करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं. संबंधित प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी पुण्याचा असून त्याची कसून चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

गुंड घायवळच्या कानशीलात लगावणारा तो कोण? 

सागर मोहोळकर हा अहमदनगर जिल्ह्यातील नानज गावचा रहिवासी असून तो कुस्तीगीर आहे. त्या दिवशी तो धाराशिवमधील अंद्रुड गावच्या जत्रेत कुस्ती पाहण्यासाठी आला होता. आयोजक आणि कुस्तीगीरांशी भेटण्याच्या दरम्यान त्यानं गर्दीतून पुढे येत घायवळवर हल्ला केला होता.

पोलिसांची कारवाई

वाशी पोलिसांनी या घटनेची स्वतःहून दखल घेत सागर मोहोळकरविरुद्ध IPC कलम 194(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्याला ताब्यातही घेण्यात आलं होतं. तपासात समोर आलेलं की, सागरचा गुन्हेगारी इतिहास आहे, त्याच्यावर दोन खुनाचे गंभीर गुन्हे दाखल होते.