पुणे : चाकणमध्ये 32 वर्षीय महिलेवर सहा भटक्या कुत्र्यांचा हल्ला, हातापायांचे लचके तोडून कपडे फाडले, मृतदेह विवस्त्रच...

मुंबई तक

16 Mar 2026 (अपडेटेड: 16 Mar 2026, 02:38 PM)

Pune News : पुणे जिल्ह्यातील चाकणमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला.  पुणे-नाशिक महामार्गावरील आंबेठाण चौकाजवळ, भटक्या कुत्र्‍यांच्या एका झुंडीने एका निष्पाप 32 वर्षीय महिलेवर हल्ला करत तिला ठार केले. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. मृत महिलेची ओळख शोभा विजय वाघमारे (वय 32 वर्षे) अशी आहे. ही घटना मध्यरात्री सुमारास अडीच वाजता घडली.

Pune News

Pune News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

सहा कुत्र्यांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू 

point

घटनास्थळी मृतदेह विवस्त्र अवस्थेत 

Pune News : पुणे जिल्ह्यातील चाकणमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पुणे-नाशिक महामार्गावरील आंबेठाण चौकाजवळ, भटक्या कुत्र्यांच्या एका झुंडीने एका निष्पाप 32 वर्षीय महिलेवर हल्ला करत तिला ठार केले. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. मृत महिलेची ओळख शोभा विजय वाघमारे (वय 32 वर्षे) अशी आहे. ही घटना मध्यरात्री सुमारास अडीच वाजता दरम्यान घडली होती.

हे वाचलं का?

हे ही वाचा : नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर रुग्णालय व्यवस्थापकाकडून शरीसंबंधाची मागणी, कुटुंबीयांना जीवे मारण्याची दिली धमकी

घडलेल्या घटनेनुसार, महिला शोभा वाघमारे या आंबेठाण चौकाजवळील उड्डाणपुलाखालून सर्व्हिस रोडने जात होत्या, त्याच दरम्यान ही दुर्दैवी घटना घडल्याचे वृत्त आहे. हा प्रकार 16 मार्च रोजी घडल्याचे वृत्त आहे. दरम्यान संबंधित महिला ही मूळची नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील होती, सध्या ती चाकण परिसरात राहत होती. 

सहा कुत्र्यांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू 

एक-दोन नाहीतर सुमारे सहा कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला असता, तिचे लचके तोडले आणि कपडे फाडून टाकले होते. हात, पाय, तोंड आणि मानेवर कुत्र्यांच्या हल्ल्याने गंभीर जखमा झाल्या. सुमारे 15 मिनिटे घटनेचा थरार सुरु होता. अतिरक्तस्त्रावामुळे शोभा यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. 

हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यातील 'या' विभागात अवकाळी पावसाचं संकट घोंगावणार, हवामानाचा अलर्ट जारी

घटनास्थळी मृतदेह विवस्त्र अवस्थेत 

सकाळी स्थानिकांनी मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळल्याने घटनास्थळ हादरून गेले. पोलिसांनी क्षणाचा विलंब न करता घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. हा हल्ला कुत्र्यांनी केल्याचे सांगण्याचे आहे. यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.