पुणे : घरच्यांनी कट रचून तरुणाला भेटायला बोलावले, नंतर 10 जणांनी मिळून तरुणाचाच गेम केला

Pune Crime : पुण्यातील कोथरुडमध्ये एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. एका तरुणाचे अल्पवयीन मुलीसोबत मैत्रीपूर्ण संबंध होते. पण याच रागातून 10 जणांच्या टोळीने तरुणाला अमानुषपणे मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप आहे. या मारहाणीत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं पुणे शहरात खळबळ उडाल्याचं चित्र आहे. 

Pune Crime News

Pune Crime News

मुंबई तक

16 Mar 2026 (अपडेटेड: 16 Mar 2026, 07:14 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

10 जणांच्या टोळीने तरुणाला संपवलं

point

आरोपींवर कठोर कारवाईची मागणी 

Pune Crime : आदित्य भवार - पुण्यातील कोथरुडमध्ये एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. एका तरुणाचे अल्पवयीन मुलीसोबत मैत्रीपूर्ण संबंध होते. पण याच रागातून 10 जणांच्या टोळीने तरुणाला अमानुषपणे मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप आहे. या मारहाणीत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं पुणे शहरात खळबळ उडाल्याचं चित्र आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बीड : 17 वर्षीय मुलीचे अपहरण करून खांबाला बांधलं, 'त्या' कारणावरून नवऱ्यासह सासू-सासऱ्यांच्या अडचणीत वाढ

10 जणांच्या टोळीने तरुणाला संपवलं

या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कायदेशीर कारवाई सुरु केली आहे. संबंधित प्रकरणात मृत तरुण नाव नागेश जाधव (वय 23) असे होते. त्याच्या पश्चात आई आणि दोन बहिणी असे त्याचे कुटुंब आहे. नागेश हा घरातील एकुलता एक कमावणारा मुलगा होता. त्याच्या जाण्याने कुटुंबावर मोठं आर्थिक संकट ओढावलं आहे. 

आरोपींवर कठोर कारवाईची मागणी 

संबंधित प्रकरणात नातेवाईकांनी या हत्येचा तीव्र निषेध नोंदवला. या घटनेनं एकच संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई किंवा अगदी शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. नेमका हा प्रकार कसा घडला, याबाबतची माहिती कुटुंबियांनी दिली. 

हे ही वाचा : नागपूर हादरलं! पेपरचं कारण देऊन मुलगा घरातून निघाला, एम्प्रेस मॉलच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारत संपवलं जीवन

दरम्यान, पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागलेली आहे. शिक्षणाचं माहेर घर असणारं पुणे आता गुन्हेगारीचं हॉटस्पॉट झालं आहे. यामुळे पुण्यातील कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. 

    follow whatsapp