Jasprit Bumrah: भारताचा हुकमी एक्का चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणार? बुमराहच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर

Jasprit Bumrah Fitness Updates Champions Trophy 2025 : दुबईत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार 19 फेब्रुवारीपासून रंगणार आहे. परंतु, आयसीसीच्या या टूर्नामेंटमध्ये टीम इंडियाच्या विजयी पताका फडकवण्याच्या आशा मावळल्या आहेत.

Jasprit Bumrah Fitness Update

Jasprit Bumrah Fitness Update

मुंबई तक

• 02:40 PM • 27 Jan 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 खेळणार की नाही?

point

बुमराहच्या फिटनेसबाबत समोर आली महत्त्वाची अपडेट

point

19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार रंगणार

Jasprit Bumrah Fitness Updates Champions Trophy 2025 : दुबईत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार 19 फेब्रुवारीपासून रंगणार आहे. परंतु, आयसीसीच्या या टूर्नामेंटमध्ये टीम इंडियाच्या विजयी पताका फडकवण्याच्या आशा मावळल्या आहेत. कारण भारताचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे शंभर टक्के फिट नसल्याचा दावा एका रिपोर्टमध्ये केला गेला आहे. सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाचव्या आणि शेवटच्या टेस्टनंतर बुमराहला पाठीच्या दुखापतीला सामोरं जावं लागत आहे.

हे वाचलं का?

रिपोर्टनुसार, वेगवान गोलंदाज बुमराह न्यूझीलंडमध्ये डॉ. रोवन स्काऊटन्या संपर्कात आहे आणि चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु होण्याआधी उपचार घेण्यासाठी न्यूझीलंडला येणार आहे. दरम्यान, टूर्नामेंटसाठी बुमराहची 100 टक्के फिट होण्याची शक्यता धूसर आहे. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) एक बॅकअप तयार केला गेला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, जर बुमराह या टूर्नामेंटसाठी पूर्णपणे फिट राहू शकला नाही, तर निवडकर्ते हर्षित राणा आणि मोहम्मद सिराजला बुमराहचा बॅकअप म्हणून तयार करू शकतात. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बीसीसीआयची मेडिकल टीम न्यूझीलंडमध्ये स्काऊटन यांच्या संपर्कात आहे. बोर्डाकडून बुमराहच्या न्यूझीलंड दौऱ्याचीही योजना आखण्यात आली होती. परंतु, आतापर्यंत असं झालं नाही. निवडकर्त्यांना माहिती आहे की, जर बुमराह निश्चित वेळेत पूर्णपणे फिट झाला, तर हा चमत्कार असेल.

हे ही वाचा >>  Anjali Damania : "अजित पवार आणि माझा 36 चा आकडा, पण...", मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल काय म्हणाल्या दमानिया?

हर्षित राणा इंग्लंड सीरिजसाठी भारताच्या वनडे टीममध्ये सामील आहे. जर बुमराह लवकर फिट झाला, तर चॅम्पियन्स ट्रॉफीतही त्याच्या निवडीबाबत विचार केला जाऊ शकतो. 2022 च्या टी-20 विश्वचषकातून बाहेर पडलेल्या बुमराहची शस्त्रक्रीय डॉ. स्काऊटन यांनी केली होती. दरम्यान बुमराह मैदानात उतरणार की नाही, याबाबत निवडकर्त्यांची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच स्पष्ट केलं जाणार आहे. बीसीसीआय 11 फेब्रुवारीपर्यंत या टूर्नामेंटसाठी भारतीय संघात बदल करू शकते. 

हे ही वाचा >> Akash Kanaujia : सैफच्या केसमध्ये फक्त संशयित म्हणून ताब्यात घेतलं, तरूणाचं सगळं आयुष्य उध्वस्त

    follow whatsapp