Anjali Damania : "अजित पवार आणि माझा 36 चा आकडा, पण...", मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल काय म्हणाल्या दमानिया?

मुंबई तक

बीडमधील गुन्हेगारीच्या विरोधात आक्रमक झालेल्या अंजली दमानिया यांनी केलेल्या अनेक खळबळजनक आरोपांची नोंद पोलिसांनाही घ्यावी लागली. त्यातच आता अंजली दमानिया यांनी अजित पवार यांनाच आवाहन केलं आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

"अजित पवार आणि माझा 36 चा आकडा..."

point

"धनंजय मुंडेंचा ताबडतोब राजीनामा घ्यायला हवा"

point

अंजली दमानिया यांची आक्रमक भूमिका, काय म्हणाल्या?

Anjali Damania : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील वातावरण ढवळून निघालं. बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच असलेल्या संतोष देशमुख यांना न्याया मिळावा या मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चे आदोलन झाले. भाजप आमदार सुरेश धस, राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी हे प्रकरण लावून धरलं. मात्र, या सर्व नेत्यांएवढंच हे प्रकरण लावून धरण्याचं काम केलं अंजली दमानिया यांनी.

अंजली दमानिया यांनी केलेल्या अनेक खळबळजनक आरोपांची नोंद पोलिसांनाही घ्यावी लागली. त्यातच आता अंजली दमानिया यांनी आणखी एक आक्रमक भूमिका घेतली आहे. अजित पवार यांना धनंजय मुंडे यांच्याविरोधात पुरावे हवे आहेत, तर ते द्यायला मी तयार आहे, त्यांनी मला भेटीसाठी वेळ द्यावा असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.

हे ही वाचा >>Ajit Pawar : अल्पवयीन आरोपींचं वय 14 वर्ष होणार? अजित पवार म्हणाले याच अधिवेशनात अमित शाह...

अंजली दमानिया काय म्हणाल्या? 

"धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, ही मागणी करण्यासाठी मी अजित पवारांना भेटण्याची वेळ मागितली आहे. अजित पवार आणि माझा ३६ चा आकडा आहे, त्यांच्या भ्रष्टाचारा विरुद्ध मी सातत्याने लढत आहे आणि मरेपर्यंत लढत राहीन, पण बीड चे जे कृत्य केले गेले ते माणुसकीला काळिमा फासणारे आहे.अशा हैवाण लोकांना थरा देणाऱ्या आणि मोठं करणाऱ्या मंत्र्याचा (धनंजय मुंडेंचा) ताबडतोब राजीनामा घ्यायला हवा होता. पण अजित पवारांना पुरावे हवे आहेत ना? मग वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे कसे एकत्र आहेत, कसे व्यवहार एकत्र आहेत, धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे हे Mahagenco शी कसे व्यवहार करत आहेत हे पुरावे दाखवण्यासाठी वेळ मागितली आहे.  हे Office of Profit आहे आणि मंत्रिपद काय
आमदारकी रद्द झाली पाहिजे. बघू कधी वेळ देतात" असं म्हणत अंजली दमानिया यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे."

हे वाचलं का?

    follow whatsapp