आरती, कांता आणि निर्मला..लेडी गँगने रेल्वे स्टेशनवर घातला होता धुमाकूळ, लहान मुलांना पकडायच्या अन् नंतर..
Womens Kidnapping Racket Viral News : एनसीआरमध्ये एका यात्रेत लोकांची मोठी वर्दळ झाल्याने फरीदाबाद पोलीस एक रुट मॅप तयार करण्यात व्यस्त होते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

3 महिला लहान मुलांचं किडनॅपिंग करायच्या आणि नंतर..

पोलिसांनी आवळल्या आरोपी महिलांच्या मुसक्या

कसा झाला लेडी गँगच्या रॅकेटचा पर्दाफाश?
Womens Kidnapping Racket Viral News : एनसीआरमध्ये एका यात्रेत लोकांची मोठी वर्दळ झाल्याने फरीदाबाद पोलीस एक रुट मॅप तयार करण्यात व्यस्त होते. अशातच पोलिसांना खबर मिळाली की, फरीदाबाद टोल प्लाझाजवळ 2-3 वर्षांचा एक मुलगा विचित्र अवस्थेत सापडतो. त्यानंतर पोलीस घटनास्थळी धाव घेतात आणि मुलाला ताब्यात घेतात आणि कुटुंबियांचा शोध सुरु करतात.
आसपासच्या जिल्ह्यात आणि पोलीस स्टेशनमध्ये मुलाचा फोटो पाठवतात. जेणेकरून मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार कुठे नोंदवली आहे का, याची माहिती मिळेल. पोलिसांच्या प्रयत्नांना यश येतं. त्यानंतर उघडकीस येतं की, दोन दिवसांपूर्वी नवी दिल्ली पोलीस स्टेशनवर एक मुलगा आई-वडिलांपासून दूर झाला होता. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्या मुलाला त्याच्या आई-वडिलांकडे पाठवण्यात येतं. त्यावेळी कुणाच्याच लक्षात आलं नाही की, हे किडनॅपिंगचं प्रकरण आहे. पूर्ण प्लॅनिंग करून या मुलाला नवी दिल्लीहून फरीदाबादला आणलं होतं.
हे ही वाचा >> MMRDA च्या नावाखाली कोट्यावधींचा गंडा! गरिब कुटुंब आले रस्त्यावर, 'त्या' महिलेचा असा झाला पर्दाफाश
कसा झाला लेडी गँगच्या रॅकेटचा पर्दाफाश?
दोन वर्षानंतर सत्य समोर आलं की, दिल्ली पोलिसांनी मुलांचं किडनॅपिंग करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या किडनॅपिंग रॅकेटला तीन महिला चालवत होत्या. या तिघीही रेल्वे स्टेशनवर गर्दीच्या ठिकाणी मुलांना किडनॅप करायच्या आणि नंतर त्यांची विक्री करायच्या. या गँगमध्ये फरीदाबादची एक नर्स, पश्चिम बंगालहून आलेली एक महिला आणि दिल्ली वकीलांकडे काम करणाऱ्या एका अकाऊंटन्ट महिलेचा समावेश होता.
आरती (उर्फ रजीना कोती), कांता भुजेल आणि निर्मला नेम्मी अशी या महिलांची नावं आहेत. आरतीचा पती सूरज सिंह सुद्धा या रॅकेटमध्ये सामील होता. पोलिसांनी या सर्व आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 137 (2), 143 आणि 61 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जर न्यायालयात हे आरोपी दोषी ठरले, तर त्यांना सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.