महाराष्ट्रातील 'या' ठिकाणी अघोरी प्रकार, वृद्ध महिलेनं बाळाच्या आईला न सांगताच विळ्याने दिले 39 चटके, कारण ऐकून हादरून जाल
Amravati Crime : अमरावतीच्या मेळघाटात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका दहा दिवसांच्या बाळाला गरम विळ्याने तब्बल 39 चटके दिल्याची संतापजनक घटना आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अमरावतीच्या मेळघाटात एक धक्कादायक घटना

दहा दिवसांच्या बाळाला विळ्याने चटके
Amravati Crime : अमरावतीच्या मेळघाटात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका दहा दिवसांच्या बाळाला गरम विळ्याने तब्बल 39 वेळा चटके दिल्याची संतापजनक घटना घडली. या अघोरी प्रकारामुळे मेळघाटात खळबळ माजली आहे. चटके देणाऱ्या वृद्ध महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार घडल्यानंतर दहा दिवसानंतर ही घटना समोर आली. लहान बाळाचे पोट फुगल्याने त्याला गरम चटके दिल्याचे कारण समोर आलं आहे.
हेही वाचा : आषाढी एकादशी निमित्त देवेंद्र फडणवीसांसह 'या' शेतकऱ्याला मिळाला विठुरायाच्या पूजेचा मान
बाळाची प्रकृती स्थिर
संबंधित प्रकरणात दिलेल्या माहितीनुसार, बाळावर अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. दरम्यान, सध्या बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. असा अघोरी प्रकार केल्याने पोटफुगी कमी होते ही अंधश्रद्धा आजही मानली जाते. मेळघाटसारख्या दुर्गम आणि सर्वाधिक आदिवासी असणाऱ्या भागातील चुकीचा समज आजही पाळला जातो. याच घटनेविरोधात लहान बाळाची आई चिचमू धोंडू सोलुकर (वय25) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
वृद्ध महिलेचा अघोरी प्रताप
लहान बाळाची आई चिचमूची कसलीही परवानगी न घेताच संबंधित वृद्ध महिलेनं लहान बाळाला तब्बल 39 चटके दिले होते. त्यानंतर बाळाच्या आईने वृद्ध महिलेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सांगितले की, या अमानुष गंभीर प्रकरणाची दखल घेण्यात आली असून, तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.
हेही वाचा : Mumbai Weather : हिंदमाता, सायन, अंधेरी सबवेत पाणी साचणार? मुंबईत 'या' भागात पाऊस घालणार धुमाकूळ
असाच एक प्रकार गेल्या काही महिन्यांपूर्वी घडला होता. एका बावीस दिवसाच्या बाळाच्या पोटावर असेच चटके देण्यात आले होते, त्यानंतर पुन्हा अशीच घटना उघडकीस आली. या घटनेनं आता खळबळ माजली आहे.