प्रियकराने महिलेच्या समोरच पतीला दाखवले शारीरिक संबंधांचे व्हिडीओ..नंतर घडली सर्वात भयंकर घटना
Married Woman Shocking Love Story Viral : वाशिम जिल्ह्यात विवाहित महिलेनं जीवन संपवल्याच्या धक्कादायक घटनेमुळं खळबळ माजली आहे. पतीच्या समोरच शारीरिक संबंध केल्याचा व्हिडीओ व्हायरल करेल, अशी धमकी महिलेच्या प्रियकराने दिली होती
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

आरोपी शेख मोबिन महिलेला भेटायचा आणि नंतर...

प्रियकराच्या धमकीमुळे महिलेनं स्वत:ला संपवलं

पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
Married Woman Shocking Love Story Viral : वाशिम जिल्ह्यात विवाहित महिलेनं जीवन संपवल्याच्या धक्कादायक घटनेमुळं खळबळ माजली आहे. पतीच्या समोरच शारीरिक संबंध केल्याचा व्हिडीओ व्हायरल करेल, अशी धमकी महिलेच्या प्रियकराने दिली होती. त्यानंतर 40 वर्षीय महिलेनं गळफास लावून स्वत:चं आयुष्य संपवलं. अफसाना असं मृत महिलेचं नाव आहे. येथील करंजा शहरात शाहीन कालोनी येथे ती राहत होती.
पोलीस अधिकारी वसंत ठाकरे यांनी दिलेली माहिती अशी की, विवाहितेच्या आत्महत्येची खबर मिळाली. आमची टीम सरकारी रुग्णालयात पोहोचली. तेव्हा मृत महिलेच्या पतीन सांगितलं की, त्याची पत्नी आणि आरोपी शेख मोबिनचे 2 वर्षांपूर्वी अनैतिक संबंध होते. पतीने दोघांनाही समजावलं होतं की, आता सर्व संपवून टाका. मृत महिलेनं तिच्या पतीचं ऐकलं होतं.
हे ही वाचा >> 'आमच्या दोघांमध्ये अंतरपाट होता तो अनाजीपंतांनी केला दूर', उद्धव ठाकरेंनी का केली अशी टीका?
आरोपी शेख मोबिन महिलेला भेटायचा आणि नंतर...
पण आरोपी शेख मोबिन कोणत्या ना कोणत्या बहाण्याने महिलेची भेट घेत होता आणि तिला शारीरिक संबंधांसाठी त्रास द्यायचा. पण 3 जुलै रोजी आरोपीने महिला आणि तिच्या पतीला बोलावलं. त्यानंतर त्याने मोबाईलमध्ये असलेला शारीरिक संबंधाचा व्हिडीओ महिलेच्या पतीला दाखवला. जर शारीरिक संबंध ठेवले नाहीत, तर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेन.
यावेळी आरोपीचा मोठा भाऊही तिथे उपस्थित होता. जर पोलिसांना सांगितलं तर तुला जीवे मारेन, अशी धमकीही आरोपीने दिली. व्हिडीओ पाहिल्यानंतर महिला आणि तिच्या पतीला धक्काच बसला. त्यानंतर महिलेनं स्वत:चं जीवन संपवलं. त्यानंतर मृत महिलेच्या पतीनं कारंजा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. दरम्यान, पोलीस आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे. आरोपी शेख अमरावतीचा रहिवासी आहे. तर आरोपीच्या भावाचा पोलीस शोध घेत आहेत. मृत महिलेचं पोस्टमार्टम केल्यानंतर मृतदेह कुटुंबियांकडे पाठवण्यात आला.