पूजाने सासऱ्यालाही सोडलं नाही! दिरासोबत अनैतिक संबंध अन्..'ते' सर्व कांड आले समोर
Pooja Jatav Shocking Viral News : मध्यप्रदेशच्या ग्वालियरमध्ये 29 वर्षांच्या पूजा जाटव प्रेमप्रकरणाने धुमाकूळ घातला आहे. या महिलेचे दोन पती होते. दीरासोबतही अफेअर होतं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

हिलं लग्न आणि नंतर पतीवर गोळीबार

पूजा जाटव प्रेमप्रकरणामुळे उडाली खळबळ

त्या गावात नेमकं घडलं तरी काय?
Pooja Jatav Shocking Viral News : मध्यप्रदेशच्या ग्वालियरमध्ये 29 वर्षांच्या पूजा जाटव प्रेमप्रकरणाने धुमाकूळ घातला आहे. या महिलेचे दोन पती होते. दीरासोबतही अफेअर होतं. इतकच नव्हे तर सासऱ्यासोबतही लव्ह स्टोरी सुरु असल्याचं बोललं जात आहे. सासऱ्यालाही तिने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं होतं. या महिलेच्या धक्कादायक कारनाम्यांमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पूजाने मागील काही वर्षात अनेक धक्कादायक कांड केले आहेत. 24 जूनला या महिलेच्या सासूची हत्या उघडकीस आल्यावर या प्रकरणाचा खुलासा झाला.
मध्यप्रदेशच्याच्या झांसीच्या तहरौली परिसरात 60 वर्षांची सुशीला देवीची हत्या करण्यात आली. बेशुद्धीचा इंजेक्शन देऊन आणि गळा दाबून या महिलेला संपवण्यात आलं होतं. घरातून दागिनेही चोरी करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी सुशीला देवीची सून पूजासोबत चौकशी केली. त्यानंतर पूजाच्या चौकशीत धक्कादायक गोष्टी समोर आल्या.
हे ही वाचा >> Raj-Uddhav: बाळासाहेबांच्या मनातलं चित्र कॅमेऱ्यात झालं कैद, ठाकरेंच्या शिवसेनेने शेअर केलेला 'हा' फोटो पाहिलात का?
पहिलं लग्न आणि नंतर पतीवर गोळीबार
29 वर्षांच्या पूजा जाटवचं लग्न 11 वर्षांपूर्वी मध्यप्रदेशमध्ये झालं होतं. पूजाने लव्ह मॅरेज केलं होतं. काही वर्ष दोघांचं नात ठीक राहिलं. पण पतीची आर्थिक स्थिती भक्कम नव्हती. तर पूजाची लाईफस्टाईल वेगळी होती. त्यामुळे पूजाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. याचदरम्यान दोघांमध्येही वादविवाद सुरु झाले. पूजाने पतीच्या हत्येची सुपारी दिली होती, असा आरोप आहे. तिच्या पतीवर गोळीबार करण्यात आला पण त्याचा जीव वाचला. त्याने पूजाच्या विरोधात तक्रार केली. पूजा काही दिवस जेलमध्ये राहीली आणि जामिन मिळाल्यानंतर कोर्टात फेऱ्या मारू लागली.
हे ही वाचा >> Raj and Uddhav Thackeray Victory Rally LIVE: राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी, उद्धव ठाकरेंनी केलं प्रचंड कौतुक
24 जूनला नेमकं घडलं तरी काय?
24 जूनला पूजाच्या मुलीचा वाढदिवस होता. यासाठी तिने संतोष आणि सासरा अजयला ग्वालियारमध्ये बोलावलं होतं. दोघेही तिथे पोहोचले, तेव्हा पूजाने बहीण कामिनी आणि तिचा प्रियकर अनिलला झांसीला पाठवून सासूची हत्या केली. हत्येची माहिती मिळताच संतोष आणि अजय तातडीनं झांसीला पोहोचले. पोलिसांच्या तपासादरम्यान, संतोष आणि अजयने सांगितलं की, तो ग्वालियरला सून पूजाला भेटण्यासाठी गेला होता. पण पूजा तिथे न गेल्याने पोलिसांना तिच्यावर संशय आला. पोलीस तपासात पूजाने गुन्हा कबूल केला. त्यामुळे पोलिसांनी पूजाला अटक केली.