Raj and Uddhav Thackeray Victory Rally LIVE: राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी, उद्धव ठाकरेंनी केलं प्रचंड कौतुक

मुंबई तक

मनसे आणि शिवसेना UBT ने संयुक्तरित्या आयोजित केलेला विजयी मेळाव्याला आता अवघे काही मिनिटं राहिली आहेत. जाणून घ्या या कार्यक्रमात नेमकं कोण-कोण भाषण करणार?

ADVERTISEMENT

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले..
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले..
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर

point

विजयी मेळाव्यात कोणाकोणाची भाषणं होणार?

point

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार?

मुंबई: अवघा महाराष्ट्र ज्या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची ऊत्सुकतेने वाट पाहत होता, तो क्षण आता अगदी समीप आला आहे. हिंदी सक्तीचा जीआर सरकारने मागे घेतल्यानंतर शिवसेना UBT आणि  मनसेने विजयी मेळाव्याचं मुंबईत   आयोजन केलं. वरळी डोम येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून आता त्याला सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाचं वैशिष्ट म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच राजकीय व्यासपीठावर समान भूमिका घेऊन एकत्र येत आहे. 

वरळी डोममध्ये पार पडणाऱ्या या मेळाव्याची अगदी जल्लोषात तयारी करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली असून राज्याच्या कानाकोपऱ्यातील लोक या मेळाव्यासाठी आले आहेत.

LIVE UPDTE:

  • कार्यक्रमाच्या शेवटी अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील एकत्र व्यासपीठावर पाहायला मिळाले
  • आमच्यातील जो अंतरपाट होता तो अनाजीपंतांनी दूर केलाय.. उद्धव ठाकरेंकडून मु्ख्यमंत्री फडणवीसांचं नाव न घेता बोचरी टीका
  • भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी केलं राज ठाकरेंचं प्रचंड कौतुक
  • शिवसेना UBT पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरू
  • मराठी या एका विषयासाठी बाळासाहेबांनी सत्तेवर लाथ मारली होती
  • अशी कधीही गोष्ट कराल तर त्याचे व्हिडिओ काढू नका.. पण उठसूठ कोणाला मारायचं असा होत नाही.
  • जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे. 
  • तुम्ही मराठी म्हणून एकत्र आलात.. आता सांगून ठेवतो.. हे आता तुम्हाला पुन्हा जातीपातीत गुंतवून ठेवतील. हे लक्षात ठेवा
  • 125 वर्ष आम्ही मराठ्यांनी देशावर राज्य केलं. पण आम्ही कोणत्या प्रांतावर मराठी भाषा कधी लादली का?
  • जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं.. आम्हाला एकत्र आणणं..
  • राज ठाकरे यांच्या भाषणाला सुरूवात 
  • शिवसेना UBT आणि मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी सुवर्ण क्षण
  • राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही नेते एकत्रच करणार व्यासपीठावर एंट्री
  • राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले.. VIP रूममध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची काही क्षण चर्चा
  • उद्धव ठाकरे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब हे वरळी डोममध्ये पोहचले
  • राज ठाकरे आणि कुटुंबीय हे वरळी डोममध्ये दाखल
  • शिवसेना UBT पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरें, पुत्र आदित्य ठाकरें आणि तेजस ठाकरेंसह वरळी डोमसाठी निघाले
  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थवरून वरळी डोमसाठी रवाना
  • वरळी डोम येथे नेते आणि कार्यकर्ते यांची तुफान गर्दी

 

हे वाचलं का?

    follow whatsapp