राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार.. अवघ्या महाराष्ट्राची उत्सुकता शिगेला.. राऊतांनी विरोधकांना काय सुनावलं?
Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणं काही जणांना बघवत नाही. असं म्हणत संजय राऊत यांनी विरोधकांवर टीका केली आहे. पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मेळाव्या आधी राऊतांनी साधला निशाणा

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं बघवत नसल्याचं राऊतांचं वक्तव्य

संजय राऊत नेमकं काय म्हणाले? पाहा...
मुंबई: हिंदी सक्तीविरोधात मनसे आणि शिवसेना (UBT) ने घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर राज्यातील फडणवीस सरकारला त्रिभाषा सूत्राचा शासन आदेश हा मागे घ्यावा लागला. ज्यानंतर मनसे आणि शिवसेना (UBT) ने याचसाठी उद्या (5 जुलै) एकत्रित विजयी मेळाव्याचं आयोजन केलं आहे. ज्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. त्याआधी शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना महत्त्वाची माहिती दिली आहे.
संजय राऊत मेळाव्याविषयी बोलताना म्हणाले की, 'हा दिवस महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणामध्ये नवे बदल घडवणारा दिवस असेल. महाराष्ट्राला प्रचंड उत्सुकता असलेल्या या दिवशी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक यायला निघाले आहेत.'
'या संपूर्ण कार्यक्रमाची तयारी शिवसेना आणि मनसेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र करत असून उद्या सकाळी 11 वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे. हा जल्लोषाचा दिवस आहे. तसंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यामुळे मराठीचा विजय झाला आहे.' असं राऊत म्हणाले.
रामदास कदमांचं वक्तव्य
दरम्यान, याच वेळी संजय राऊत यांनी रामदास कदमांवर जोरदार टीकाही केली. 'मिंधे गटाच्या लोकांना राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं बघवत नाही. तसेच जे मोदी आणि अमित शाहांचे झाले आहेत त्या नेत्यांनी ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल बोलू नये. त्यांनी स्वत:ची चिंता करावी.' असा टोलाही राऊतांनी रामदास कदमांना लगावला आहे.