जेवणात मीठ कमी झालं..नराधम पतीने गर्भवती पत्नीला टेरेसवरून फेकलं, नंतर घडली भयंकर घटना!

मुंबई तक

Shocking Crime News : उत्तरप्रदेश येथील कोतवाल ढोलना परिसरात नगला ढक गावात एक खळबळजनक घटना घडली आहे. जेवणात मीठ कमी असल्याने नराधम पतीने सहा महिन्यांच्या गर्भवती पत्नीला मारहाण करत टेरेसवरून खाली फेकलं.

ADVERTISEMENT

Husband-Wife Shocking Viral News
Husband-Wife Shocking Viral News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

पतीने गर्भवती पत्नीला मारहाण करत छतावरून फेकून दिलं..

point

रुग्णालयात उपचारादरम्यान महिलेचा झाला मृत्यू

point

पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरोधात नोंदवला गुन्हा

Shocking Crime News : उत्तरप्रदेश येथील कोतवाल ढोलना परिसरात नगला ढक गावात एक खळबळजनक घटना घडली आहे. जेवणात मीठ कमी असल्याने नराधम पतीने सहा महिन्यांच्या गर्भवती पत्नीला मारहाण करत टेरेसवरून खाली फेकलं. ब्रजमाला असं मृत महिलेचं नाव आहे. रिपोर्टनुसार, ब्रजमालाचं पती रामशरणसोबत क्षुल्लक कारणावरून वादविवाद झाला होता.

पतीने गर्भवती पत्नीला मारहाण करत छतावरून फेकून दिलं..

हा वाद इतका वाढला की, रागाच्या भरात त्याने पत्नीला मारहाण केली आणि रागाच्या भरात तिला छतावरून फेकलं. त्यानंतर ब्रजमालाची सासू मीरा देवीने तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. परंतु, तिची प्रकृती गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण गावात खळबळ माजली आहे. 

ब्रजमालाच्या कुटुंबावर आधीच दु:खाचा डोंगर पसरला होता. तिचे वडील आणि मोठ्या भावाचा पूर्वीच मृत्यू झाला होता. माहेरी फक्त तिची वहिणी आणि आई राहायची. पण या घटनेमुळं पीडित कुटुंबाला आणखी मोठा धक्का बसला. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. या अमानवी घटनेमुळं लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

हे वाचलं का?