दोन मुलं असलेल्या महिलेला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडलं! लोकांनी रुममध्येच दोघांना कुटलं अन् सिंदूर..

मुंबई तक

Married Woman Shocking Viral News : सहरसा जिल्ह्यातील बैजनाथपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या एका विवाहित महिलेनं धक्कादायक कारनामा केला आहे.

ADVERTISEMENT

Married Woman Shocking Love Story
Married Woman Shocking Love Story
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विवाहित महिलेला प्रियकरासोबत रुममध्ये पकडलं अन्..

point

महिलेच्या कपाळावरील सिंदूर पुसलं, नंतर घडलं..

point

त्या गावात नेमकं घडलं तरी काय?

Married Woman Shocking Viral News : सहरसा जिल्ह्यातील बैजनाथपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या एका विवाहित महिलेनं धक्कादायक कारनामा केला आहे. दोन मुंल असलेल्या या महिलेला रुममध्ये तरुणासोबत नको त्या अवस्थेत पकडलं. त्यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक लोकांनी प्रेमप्रकरणाचा आरोप करत तरुणाला रस्सीने बांधून मारहाण केली. त्यानंतर त्या महिलेचं सिंदूर पुसलं आणि तरुणासोबत तिचं लग्न लावलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

पतीसोबत झाला वाद अन् महिलेनं..

पीडित महिला बैजनाथपूर पोलीस स्टेशन हद्दीतील वॉर्ड नंबर 22 मध्ये राहणाऱ्या राकेशची पत्नी आहे. आरती असं या महिलेचं नाव असून राकेशसोबत तिचं लग्न दहा वर्षांपूर्वी झालं होतं. या महिलेला दोन मुलं आहेत. एक सात वर्षांचा मुलगा आहे आणि दुसरा नऊ वर्षांचा आहे. आरतीने म्हटलंय की, तिचं पतीसोबत घरगुती वाद होत होते. तिचा पती तिला दुकानात जास्त वेळ बसण्यासाठी सांगायचा. यामुळे दोघांमध्ये वाद होत होता.

हे ही वाचा >> पुणे हादरलं! "ए पप्पी दे तुला..." 73 वर्षीय वृद्धाने तरुणीवर केला विनयभंग

महिलेच्या कपाळावरील सिंदूर पुसलं अन्..

पीडित महिलेच्या पतीचं लॉर्ड बुद्धा मेडिकल समोर चहाची टपरी आहे. त्याचदरम्यान महिलेची कॉलेज कॅन्टिनमध्ये काम करणाऱ्या रांची येथील बाबुल मुखर्जी (20) सोबत ओळख झाली होती. 3 जुलैच्या रात्री भूख लागल्यामुळे तिने बाबूलला जेवण घेऊन घरी बोलावलं. याचदरम्यान स्थानिक लोकांनी त्यांना पकडलं. लोकांनी त्या महिलेला मारहाण केली आणि तरुणाला अर्धनग्न करून एका रुममध्ये बंद केलं. त्यानंतर तरुणाचे रस्सीने हातपाय बांधले आणि त्याला मारहाण केली.

हे ही वाचा >>बाप म्हणावं की हैवान? पुण्यात वडिलांनी 40 दिवसाच्या लेकाला विकलं, कारण ऐकून बसेल धक्का

तसच महिलेच्या कपाळावर असलेलं सिंदूर पुसलं आणि तिचं लग्न तरुणासोबत लावून दिलं. दरम्यान, या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. आरतीला सोडून तरुण शुक्रवारी फरार झाला. बैजनाथपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी चंद्रदीप प्रभाकर यांनी म्हटलंय की, दोघेही अल्पवयीन आहेत. कोणीही लेखी स्वरुपात तक्रार दाखल केली नाही. पोलीस स्टेशनमध्ये नोंद करून दोघांना सोडून दिलं आहे. तक्रार आल्यानंतर कारवाई केली जाईल.

हे वाचलं का?

    follow whatsapp