बाप म्हणावं की हैवान? पुण्यात वडिलांनी 40 दिवसाच्या लेकाला विकलं, कारण ऐकून बसेल धक्का
pune crime : पुणे शहरात आपल्याच बापाने आपल्या 40 दिवसांच्या लहान नवजात बाळाला विकलं आहे. या घटनेनं पुणे हादरून गेलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पुण्यातील बिबवेवाडीत लहान बाळाला विकलं

येरवडा पोलिसांकडून गुन्हे दाखल
Pune Crime : पुणे शहरात आपल्याच बापाने आपल्या 40 दिवसांच्या लहान नवजात बाळाला विकलं आहे. याचं कारण ऐकून तुम्हाला मोठा धक्का बसले. लहान बाळाचा कोणताही कायदेशीर सोपस्कार न करता बेकायदेशीररित्या सौदा केल्याची माहिती उघडकीस आली. येरवडा पोलिसांनी संबंधित प्रकरणात आई-वडील आणि बाळ विकण्यास मध्यस्ती करणाऱ्या दलालस तसेच खरेजी करणाऱ्या महिलेसह इतर सहा जणांना अटक केली आहे. या घटनेनं पुण्यात संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा : आषाढी एकादशी निमित्त देवेंद्र फडणवीसांसह 'या' शेतकऱ्याला मिळाला विठुरायाच्या पूजेचा मान
अर्थिक चणचण भासल्याने बाळाला विकलं
अर्थिक चणचण भासल्याने चक्क वडिलांनी आपल्या पोटच्या केवळ 40 दिवस जन्मलेल्या बाळाला विकलं. पैशांची अवश्यकता असल्याने एका दलालाने बाळ दोन लाखांना विक्री करून देण्याचे आमिष दाखवले आहे. मध्यस्ती दलालाने साडे तीन लाख रुपयांनी बाळाची विक्री केली. त्यापैकी दीड लाख रुपये कमिशन त्याने स्वत:कडेच ठेवले होते.
अपव्यापाराचं प्रकरण उघडकीस
मुलीला अधिक पैसे देऊन फसवणूक केल्याचा आई वडिलांना संशय आला. याच आर्थिक फसवणुकीच्या संशयातून त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमुळेच माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. अपव्यापाराचा गंभीर गुन्हा उघडकीस आला.
हेही वाचा : महाराष्ट्रातील 'या' ठिकाणी अघोरी प्रकार, वृद्ध महिलेनं बाळाच्या आईला न सांगताच विळ्याने दिले 39 चटके, कराण ऐकून हादरून जाल
या प्रकरणात आता पोलिसांनी बालिकेची आई मिनल ओकार (30), वडील ओंकार औंदुंबर सपकाळ (29 ) , दलाल साहिल अफजल बागवान (वय 27), रेश्मा पानसरे (वय 34 ), सचिन आवताडे (वय 44) सेच बाळाची खरेदी करणारी महिला दीपाली विकास फटांगरे (वय 32) यांना अचक करण्यात आली आहे. आता यांच्या विरोधात भरतीय न्यायसंहितेच्या कलम 143 (2) , 143 (4), 3 ( 4) ह बाल न्याय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.