पुणे हादरलं! "ए पप्पी दे तुला..." 73 वर्षीय वृद्धाने तरुणीवर केला विनयभंग
Pune News : एका 73 वर्षीय वृद्धाने एका क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा विनयभंग केला आहे. पुण्यातील धक्कादायक घटना समोर आलेली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

73 वर्षीय वृद्धाने महिलेवर केला विनयभंग

पप्पीची मागणी करत सोडली पातळी
Pune News : संस्कृतीचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलेला आहे. एका 73 वर्षीय वृद्धाने एका क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा विनयभंग केला आहे. क्लिनिकमध्ये एकटीला पाहून वृद्धाने पातळी सोडून "मला एक पप्पी दे" असं म्हणत तरुणीसोबत अश्लील वर्तन केलं. या प्रकरणी आता संबंधित वृद्धावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा : बाप म्हणावं की हैवान? पुण्यात वडिलांनी 40 दिवसाच्या लेकाला विकलं, कारण ऐकून बसेल धक्का
वृद्धाकडून तरुणीवर विनयभंग
दरम्यान, विश्रामबाग येथे एक क्लिनिक असून तिथं पीडित तरुणी रिसेप्सनिस्ट म्हणून काम करत होती. त्याच रिसेप्शनिस्ट तरुणीसोबत विनयभंग करण्यात आला. वृद्धाच्या अशा कृत्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही घटना 3 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
'पप्पी दे' म्हणत..
विश्रामबाग पोलिसांनी संबंधित वृद्धाला अटक केली आहे. वृद्धाचे नाव सुरेशचंद्र चोरडिया असे आहे. तरुणी एकटीच पाहूण तो तरुणीसोबत गैरवर्तन करू लागला होता. त्याने अचानकपणे सर्व मर्यादा सोडून रिसेप्शनिस्टच्या गालाला हात लावला आणि 'पप्पी दे' म्हणत गैरवर्तन केलं.
त्याने खिशाकडे हात दाखवत जेवायला घेऊन जातो असं म्हणाला. "माझ्याकडे पैसे आहेत, तुला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जातो, तुला जे हवंय ते मी देतो, पण तू मला हवंय ते कर", हे सर्व ऐकून संबंधित तरुणी घाबरू लागली होती. त्यानंतर तरुणीने क्लिनिक सोडलं आणि बाहेर पळा काढला. त्यानंतर वृद्धाने तिचा पाठलाग सोडला नाही. "उद्या क्लिनिकमध्ये आहेस का?" असा निर्लज्जासारखा प्रश्न केला.
हेही वाचा : महाराष्ट्रातील 'या' ठिकाणी अघोरी प्रकार, वृद्ध महिलेनं बाळाच्या आईला न सांगताच विळ्याने दिले 39 चटके, कराण ऐकून हादरून जाल
वृद्धाच्या अशा वर्तणुकीने संबंधित तरुणी भयभीत झाली होती. या प्रकारामुळे तरुणीचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात आरोपी वृद्धावर संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती वृत्त माध्यमांनी दिली आहे.