MMRDA च्या नावाखाली कोट्यावधींचा गंडा! गरिब कुटुंब आले रस्त्यावर, 'त्या' महिलेचा असा झाला पर्दाफाश
Mumbai News : एमएमआरडीचे सर्वेक्षण अधिकारी अशी खोटी ओळख सांगून एका व्यक्तीने काही गरीब कुटुंबांना आणि दोन महिलांना कोट्यवधी रुपयांची फसणवूक केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

एमएमआरडीचे सर्वेक्षण अधिकारी अशी खोटी ओळख सांगून गरीबांची फसवणूक

महिलांविरोधात गुन्हा दाखल
Mumbai News : एमएमआरडीएचे सर्वेक्षण अधिकारी अशी खोटी ओळख सांगून एका व्यक्तीने काही गरीब कुटुंबांना आणि दोन महिलांना कोट्यवधी रुपयांची फसणवूक केली. एमएमआरडीएकडून केवळ 8 लाख रुपयांमध्ये घर देतो असे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. पंधराहून अधिक लोकांकडून दीड ते दोन कोटी रुपयांपर्यंतची फसणवूक केली. या प्रकरणात भांडूप पोलिसांनी नीता सराईकर आणि लक्ष्मी बांडे नावाच्या दोन महिलांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
हेही वाचा : पुणे हादरलं! "ए पप्पी दे तुला..." 73 वर्षीय वृद्धाने तरुणीवर केला विनयभंग
स्वस्तेत घरे देतो सांगून केली फसवणूक
फसणुकीला बळी पडलेल्या महिलेचं नाव मीरा कांबळे असून त्यांनी भांडूप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.त्या म्हणाल्या की, तिच्या इमारतीत राहणाऱ्या लक्ष्मी बांडेनं माहित दिली की, एमएमआरडीएने बांधलेली घरं फक्त आठ लाख रुपयांत मिळतात. त्यानंतर लक्ष्मीने एमएमआरडीएच्या पुनर्विकास अंतर्गत सर्वेक्षण अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या नीता सराईकरशी मीराची भेट घडवली होती.
कुर्ला आणि कांजूरमार्ग भागातील झोपडपट्टीवासीयांसाठी बांधण्यात आलेली घरे लवकरच त्यांना दिली जातील, असं सराईकर म्हणाल्या आहेत. कमी किंमतीत घरे मिळण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी त्यांनी त्यांची सध्याची घरे 12 लाख रुपयांना विकली आहेत. त्यांचे दागिने गहाण ठेवले आहेत. त्यांची वडिलोपर्जित जमीन विकली असून कुटुंबातील एका सदस्यांकडून कर्जही घेतले. या प्रकारे त्यांनी एकूण 33 रुपये रोख नीता सराईकर यांना दिले.
हेही वाचा : बाप म्हणावं की हैवान? पुण्यात वडिलांनी 40 दिवसाच्या लेकाला विकलं, कारण ऐकून बसेल धक्का
15 जणांकडून दीड ते दोन कोटी रुपये उकळले
तीन महिन्यानंतरही घराचा ताबा न मिळाल्याने कांबळे यांनी सरायकर यांच्याशी संपर्क साधला, पण त्यानंतर त्या काही ना काही कराणं देत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, इतर काही लोकांचीही अशीच फसवणूक करण्यात आली. या प्रकरणातून माहिती समोर आली की, सरायकर आणि लक्ष्मी बांडे यांनी आतापर्यंत सुमारे 15 जणांकडून दीड ते दोन कोटी रुपये उकळले. या प्रकरणात भांडूप पोलिसांनी दोन्ही महिलांविरोधात एफआरआय दाखल करण्यात आला आहे.