बायकोने तर केलंच..पण सासूनेही मर्यादा सोडल्या..वैतागलेल्या जावयाने स्वत:ला संपवलं!

मुंबई तक

Shocking Viral News Today :  उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथे नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पत्नी आणि सासूने जावयाचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ADVERTISEMENT

Family Shocking Viral News
Family Shocking Viral News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पत्नी अन् सासुने जावयासोबत केलं भयंकर!

point

जावयाने गळफास लावून स्वत:ला संपवलं..

point

श्यामपुरी कॉलनीत नेमकं काय घडलं?

Shocking Viral News Today :  उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथे नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पत्नी आणि सासूने जावयाचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोघांची त्रास असह्य झाल्याने जावयाने स्वत:चं जीवन संपवलं. मृताच्या कुटुंबियांच्या तक्रारीनुसार, आरोपी पत्नी आणि सासूसह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी म्हटलंय की, श्यामपूरी कॉलनीत एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृताच्या भावाने त्याची पत्नी, सासू आणि ओळखीच्या एका तरुणाविरोधात कोतवाली मंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मृतदेहाचं पोस्टमार्टम करून कुटुंबियांकडे पाठवला आहे.

श्यामपुरी कॉलनीत नेमकं काय घडलं?

दरम्यान, पोलिसांकडून याप्रकरणाचा कसून तपास सुरु आहे. धोबी घाट येथील श्यामपूरी कॉलनीत राहणाऱ्या सौरभ पुत्र महावीरचं लग्न 2021 मध्ये शालूसोबत झालं होतं. दोघांनाही चार वर्षांचा मुलगा आहे. सौरभचा भाऊ रवी सैनीने आरोप केला आहे की, लग्नाच्या आधी शालूचं कोतवाली मंडी परिसरातील रहिवासी रोबिन नावाच्या तरुणाशी ओळख होती. 

हे ही वाचा >> दोन मुलं असलेल्या महिलेला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडलं! लोकांनी रुममध्येच दोघांना कुटलं अन् सिंदूर..

आरोप केला जात आहे की, पत्नी शालू आणि सासू ममतेशने रॉबिनसोबत मिळून सौरभला पाच लाख रपये आणि संप्पती विकून घरजावई बनवण्यासाठी दबाव टाकत होते. सौरभाला त्याच्या कुटुंबियांपासून वेगळंही केलं होतं. कुटुंबियांनी सतत मानसिक त्रास दिल्याने सौरभने गळफास लावून आयुष्य संपवलं.

याप्रकरणाचा तपास सुरु

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी मृतदेह ताब्यात घेतला. मृताचा भाऊ रवी सैनीने शालू, तिची आई आणि रॉबिन विरोधात तक्रार दाखल केली. एसपी व्योम बिंदल यांनी याप्रकरणी म्हटलं की, मृतदेहाचं पोस्टमार्ट करण्यात आलं आणि मृतदेह कुटुंबियांकडे पाठवण्यात आला. मृताच्या भावाच्या तक्रारीनुसार, तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

हे ही वाचा >> MMRDA ची स्वस्त दरात घरे देण्याचे खोटे आश्वासन अन् कोट्यवधींची फसवणूक, गरीब कुटुंब रस्त्यावर

हे वाचलं का?

    follow whatsapp