महिलेनं पतीला सोडलं, नंतर जडला पुतण्यावर जीव, रोमान्स करतानाचे दोघांचे व्हिडिओ व्हायरल

मुंबई तक

Crime News : काकाला फसवून काकी आपल्याच पुतण्यासोबत पळून गेली, त्यानंतर दोघेही परतले, पण काकानेच आपल्या पत्नीचा विवाह त्याच्या पुतण्याशी लावून दिला. त्यानंतर ते दोगेही हैदराबादला निघून गेले.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

काकाला फसवून काकी आपल्याच पुतण्यासोबत गेली पळून

point

काकीचे आणि पुतण्याचे रोमान्स करतानाचे व्हिडिओ व्हायरल

Crime News : मध्यंतरी बिहारमधील एका महिलेचं आणि तिच्याच पुतण्याच्या प्रेमसंबंधाच्या बातम्यांनी वेग धरला होता. अनेकांच्या नजरा केवळ काकी आणि पुतण्याच्या प्रेमसंबंधाकडेच होत्या. काकाला फसवून काकी आपल्याच पुतण्यासोबत पळून गेली, त्यानंतर दोघेही परतले, पण काकानेच आपल्या पत्नीचा विवाह त्याच्या पुतण्याशी लावून दिला. त्यानंतर ते दोगेही हैदराबादला निघून गेले. अशातच आता त्या दोघांचेही नवीन तीन व्हिडिओ आता व्हायरल झाले आहेत. यामुळे आता हे प्रकरण पुन्हा एकदा समोर आलं आहे. 

हेही वाचा : MMRDA ची स्वस्त दरात घरे देण्याचे महिलेकडून आश्वासन अन् कोट्यवधींची फसवणूक, गरीब कुटुंब रस्त्यावर, मुंबईत नेमकं काय घडलं?

नेमकं काय घडलं? 

ही घटना बिहारमधील पटना येथील आहे. आयुषी (वय 24) महिलेचा विवाह हा जुमाई येथील सिकारीया गावातील विशाल कुमार दुबे नावाच्या तरुणासोबत झाला होता. सुरूवातीचे काही दिवस चांगले गेले, त्यानंतर आयुषीचं मन बदलू लागलं. तिला विशालपेक्षा तिचा पुतण्या सचिनच आवडू लागला होता. त्यांच्यामध्ये अधिक जवळीकता वाढली. त्यांची एकमेकांसोबत मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर हे नात्यात झालं आणि दोघांचे प्रेमसंबंध सुरू झाले. विशालने अनेकदा आयुषीला समजावण्याचा प्रयत्न केला. पण ती ऐकतच नव्हती. विशालला आयुषीपासून एक मुलगी देखील होती, तरीही आयुषीला सचिनसोबतच राहायचे होते. 

आयुषी आणि विशालमध्ये दररोज वाद...

यामुळे कुटुंबात तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. आयुषी आणि विशालमध्ये दररोज वाद व्हायचा. त्यानंतर विशालने न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. त्यानंतरच आयुषी आणि सचिन हे दोघे पाच दिवसानंतर फरार झाले. ते परत येताच त्यांनी विशाल आणि आयुषीने एका मंदिरात आपला विवाह केला. त्यावेळी विशाल म्हणाला की, मी मुलीला माझ्याकडेच ठेवतो, तिला (आयुषी) ज्याच्यासोबत राहायचं आहे त्याच्यासोबत राहू दे. मला आता कसलीही परवा करायची नाही. त्यानंतर ते दोघेही हैदराबादला गेले, विशाल चहाचे दुकान चालवतो आणि आपल्या मुलांचं संगोपन करतोय. तर दुसरीकडे आयुषी सचिनसोबत मैजमाजा करते. 

हेही वाचा : पुणे हादरलं! "ए पप्पी दे तुला..." 73 वर्षीय वृद्धाने तरुणीवर केला विनयभंग

आयुषी आणि सचिनचे रोमान्स करतानाचे तीन व्हिडिओ व्हायरल झाले होते तेव्हा लोक हे प्रकरण विसरून गेले होते. पण आता या प्रकरणाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. तिन्ही रिल्समध्ये ते दोघेही रोमान्स करताना दिसत आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp