प्रेयसीच्या फोनवरुन मेसेज करुन बोलावून घेतलं, नंतर घरच्यांनी केला घात; तरुणाच्या हत्येनं पुण्यात खळबळ

मुंबई तक

Pune Crime : पुण्यातील कोथरूड परिसरात प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीसोबत असलेल्या संबंधाच्या रागातून तरुणाला बोलावून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

ADVERTISEMENT

Pune Crime
Pune Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

प्रेयसीच्या फोनवरुन मेसेज करुन बोलावून घेतलं, नंतर घरच्यांनी केला घात

point

तरुणाच्या हत्येनं पुण्यात खळबळ

Pune Crime : पुण्यातील कोथरूड परिसरात प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीसोबत असलेल्या संबंधाच्या रागातून तरुणाला बोलावून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी दहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

हे ही वाचा : लग्नाला नकार दिल्याने HIV पॉझिटिव्ह तरुणाने सूड उगवला, 'ती' आयुष्यात विसरणार नाही असं केलं कृत्य

मेसेज करुन बोलावले 

मिळालेल्या माहितीनुसार, नागेश जाधव असे मृत तरुणाचे नाव आहे. नागेशचे एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले आहे. या संबंधाची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांनी संताप व्यक्त केल्याचे सांगितले जाते. यानंतर मुलीच्या मोबाईलवरूनच नागेशला मेसेज करून एका ठिकाणी बोलावून घेण्यात आले. नागेश त्या ठिकाणी पोहोचताच मुलीचे वडील आणि इतर नातेवाईकांनी त्याच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत नागेश गंभीर जखमी झाला.

दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जखमी अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर नागेशच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात मध्ये मुलीचे वडील तसेच इतर नातेवाईकांसह एकूण दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगी अल्पवयीन असल्याने या प्रकरणाला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp