अहो राव! काय ते आजचे सोन्याचे भाव, 22 अन् 24 कॅरेट सोन्याचे दर वाचून धडकीच भरेल!
Gold Rate Today : मागील काही दिवसांपासून देशभरात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?
22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?
मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Gold Rate Today : मागील काही दिवसांपासून देशभरात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 1410 रुपयांनी वाढले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 1300 रुपयांनी महागले आहेत. आज रविवारी 6 जुलै रोजी देशातील अनेक शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98 हजारांच्या पुढे गेले आहेत.
तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90 हजारांच्या आसपास आहेत. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 98980 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 90750 रुपयांवर पोहोचले आहेत. मागील एक आठवड्यात चांदीच्या प्रति किलोग्रॅमच्या किंमतीतही 2200 रुपयांची वाढ झाली आहे. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील आजचे भाव काय आहेत, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे भाव
मुंबई
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98830 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90600 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98830 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90600 रुपये झाले आहेत.









