पैसा-पाणी: शेअर बाजारात तब्बल 36 हजार कोटींचा घोटाळा?

शेअर बाजारात वेगवेगळ्या पद्धतीने घोटाळे केले जातात. तशाच स्वरूपाचा आणखी एक घोटाळा आता समोर आल्याचं बोललं जात आहे. जाणून घ्या याविषयी पैसा-पाणी या विशेष ब्लॉगमध्ये.

ADVERTISEMENT

शेअर बाजारात तब्बल 36 हजार कोटींचा घोटाळा?
शेअर बाजारात तब्बल 36 हजार कोटींचा घोटाळा?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शेअर बाजारात पुन्हा एकदा मोठा घोटाळा झाल्याची चर्चा

point

शेअर बाजाराकडून जेन स्ट्रीटवर मोठी कारवाई

point

सेबीने जेन स्ट्रीटचे 4843 कोटी रुपये केले जप्त

शेअर बाजारावर देखरेख करणारी संस्था SEBI (Securities and Exchange Board of India) ने परदेशी गुंतवणूकदार जेन स्ट्रीटला (Jane Street)व्यापार करण्यास बंदी घातली आहे. त्यांचे 4843 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. SEBI चे म्हणणे आहे की, 1 जानेवारी 2023 ते 31 मार्च 2025 दरम्यान, जेन स्ट्रीटने बेकायदेशीर पद्धतीने 36 हजार कोटी रुपयांचा नफा कमावला. हा नफा कुठे ना कुठे तुमच्या आणि माझ्यासारख्या लहान गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीतून मिळवला गेला आहे.

नेमका घोटाळा कसा झाला?

जेन स्ट्रीट ही जगातील सर्वात मोठी Quant Firms म्हणजेच Quantitative Trading करणारी कंपनी आहे. Quantitative म्हणजे हा ट्रेडिंग कॉम्प्युटर प्रोग्राम, गणित आणि Algorithm वापरून केला जातो. हे ट्रेडिंग मायक्रो सेकंदात होतो. म्हणजे जोवर एखाद्या व्यक्ती विचार करेल तेवढ्या वेळात व्यवहार झालेला देखील असेल. जेन स्ट्रीट गुंतवणूकदारांच्या पैशाने नव्हे तर स्वतःच्या पैशाने व्यवसाय करते. ते MIT, IIT मधील इंजिनिअर आणि गणितज्ञांना मोठ्या पगारावर कामावर ठेवते. जे ट्रेडिंगच्या गणितावर काम करतात.

SEBI ने Jane Street चार कंपन्या पकडल्या आहेत. गेल्या अडीच वर्षातील सर्वात नफ्याच्या 30 दिवसांचे व्यवहार समजले तेव्हा त्यापैकी 18 दिवस Bank Nifty आणि 3 दिवस Nifty व्यवहार झाले. सेबीने गेल्या वर्षीच्या 17 जानेवारीचे उदाहरण देऊन हे स्पष्ट केले आहे.

17 जानेवारी 2024 रोजी Bank Nifty ची सुमारे 2000 अंकांनी घसरून त्याची सुरुवात झाली होती. या घसरणीच्या काळात, Jane Street ने Cash आणि Futures Market  मध्ये 4370 कोटी रुपयांचे बँक शेअर्स खरेदी करण्यास सुरुवात केली. यामुळे Bank Nifty वर जाऊ लागला. 

Future Options त्याचा परिणाम असा झाला की,  Call option महाग होऊ लागला कारण बाजार वर जाण्याची शक्यता वाढली होती. या Options मध्ये, तुम्ही गुंतवणूक करता की, स्टॉक किंवा निर्देशांक वर जाईल. पण 17 जानेवारी रोजी सकाळपासून, जेन स्ट्रीटच्या खरेदीमुळे बाजार वर जात होता.

दुसरीकडे, Put Option म्हणजे Bank Nifty च्या घसरणीचा सौदा - स्वस्त होऊ लागला, कारण जेव्हा मार्केट वर जात असतं तेव्हा तो खाली जाईल अशा स्वरूपाची गुंतवणूक फार कमी लोक करतात.

Jane Street ने सकाळी 9.15 ते 11.45 पर्यंत Future Options मध्ये सुमारे  32 हजार कोटी रूपयांचे सौदे केले. त्यानंतर, त्यांनी सकाळी खरेदी केलेल्या बँकेच्या शेअर्सची हळूहळू विक्री सुरू केली. बाजार बंद होईपर्यंत हे चालू राहिले. पण त्यामुळे बँक शेअर्स आणि Bank Nifty दोन्ही खाली येऊ लागले. Jane Street ने Options मध्ये पैसे कमवले कारण त्यांनी आधीच घसरणीवर पोझिशन घेतली होती.

तुम्ही असे म्हणू शकता की, बाजारात नफा खरेदी आणि विक्री करून नफा मिळवला जात असेल, तर यात काय चूक आहे? यात चूक काही नसतं जर Jane Street ने त्यांच्या रिसर्च किंवा आकलनाच्या आधारे Call किंवा Put Option ठेवले असते तर काहीही चूक झाली नसती. पण त्यांनी त्याऐवजी बाजार वर नेला आणि नंतर दुसऱ्या मार्गाने बाजाराची घसरण केली. SEBI ने यावर खटला दाखल केला आहे. Jane Street ला यावर 21 दिवसांत उत्तर द्यावे लागेल. खटला सुरू राहील पण लहान गुंतवणूकदारांच्या नुकसानाची भरपाई कोण करेल?

 

'पैसा-पाणी' या विशेष सदरातील इतर महत्त्वाचे ब्लॉग वाचा

 

 

हे वाचलं का?

    follow whatsapp