काय सांगता! सोन्याचे दर पुन्हा कडाडले; तुमच्या शहरातील 24 कॅरेेट सोन्याचा भाव वाचून टेन्शनच वाढेल
Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या भावात मागील काही दिवसांपासून मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज 4 जून 2025 रोजी सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?
22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?
मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या भावात मागील काही दिवसांपासून मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज 4 जून 2025 रोजी सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 99340 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 91060 रुपये झाले आहेत.
दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 99490 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 91210 रुपयांवर पोहोचले आहेत. चांदीच्या किंमतीतही प्रति किलोग्रॅममागे 100 रुपयांची वाढ झाली आहे. आज 1 किलोग्रॅम चांदीचे दर 111100 रुपये झाले आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर
मुंबई
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 98730 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 90500 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 98730 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 90500 रुपये झाले आहेत.









