बाईईई...हा काय प्रकार! रोज रोज का होतेय सोन्याच्या दरात वाढ? आजचे भाव वाचून भुवया उंचावतील
Gold Rate Today : मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज शुक्रवारी 5 जुलै 2025 रोजी सोन्याच्या किंमतीत किरकोळ वाढ झाल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?
22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?
मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Gold Rate Today : मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज शुक्रवारी 5 जुलै 2025 रोजी सोन्याच्या किंमतीत किरकोळ वाढ झाल्याचं समोर आलं आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 99340 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91060 रुपयांवर पोहोचले आहेत.
राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 99490 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 91210 रुपये झाले आहेत. चांदीच्या प्रति किलोग्रॅमच्या किंमतीतही 100 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे एक किलोग्रॅम चांदीचे भाव 111100 रुपये झाले आहेत. अशातच जाणून घ्या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याच्या किंमतीबाबत सविस्तर माहिती..
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे दर काय?
मुंबई
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 98830 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 90600 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 98830 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 90600 रुपये झाले आहेत.










