Akash Kanaujia : सैफच्या केसमध्ये फक्त संशयित म्हणून ताब्यात घेतलं, तरूणाचं सगळं आयुष्य उध्वस्त
पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या या संशयिताचं नाव आहे आकाश कनौजिया. 31 वर्षांचा हा तरूण व्यवसायाने ड्रायव्हर आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सैफ अली खान प्रकरणात ताब्यात घेऊन सोडलं

आकाश कनौजिया म्हणाला पोलिसांमुळे सगळं उध्वस्त झालं

सैफ अली खानच्या घरासमोर बसणार, आकाश कनौैजिया न्याय मागणार
Akash Kanaujia Story : सैफ अली खानवरील हल्ल्यातील आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद पोलिसांच्या ताब्यात आहे. पण शरीफुलला अटक करण्यापूर्वी पोलिसांनी छत्तीसगडमधील दुर्गमधून एका व्यक्तीला संशयित म्हणून ताब्यात घेतलं होतं. नंतर त्याला सोडून देण्यात आलं. पण त्याला सोडेपर्यंत त्या संशयिताचा फोटो सर्व माध्यमांमध्ये पसरला होता. त्यामुळे आता या संशयिताला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय.
माध्यमांशी बोलताना त्या व्यक्तिने पोलिसांवर आपला राग व्यक्त केला. पोलिसांमुळे आपलं आयुष्य अक्षरश: उद्ध्वस्त झालं असं तो म्हटला आहे. तसंच त्यानं न्यायाची मागणी सुद्धा केली आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर त्याची नोकरी गेली आहे, लग्न रद्द झालं, कुटुंबाला बदनामीचा सामना करावा लागतोय.
हे ही वाचा >> Ajit Pawar : अल्पवयीन आरोपींचं वय 14 वर्ष होणार? अजित पवार म्हणाले याच अधिवेशनात अमित शाह...
पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या या संशयिताचं नाव आहे आकाश कनौजिया. 31 वर्षांचा हा तरूण व्यवसायाने ड्रायव्हर आहे. मुंबई पोलिसांकडून माहिती मिळाल्यानंतर, रेल्वे संरक्षण दलाने 18 जानेवारी रोजी दुर्ग स्थानकावर मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस-कोलकाता शालीमार ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमधून आकाशला ताब्यात घेतलं. त्यानंतर 19 जानेवारी रोजी सकाळी मुंबई पोलिसांनी बांगलादेशी नागरिक मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला पोलिस ठाण्यातून अटक केली. त्यानंतर दुर्गच्या रेल्वे सुरक्षा दलाने आकाशला सोडून दिलं.
"माझं लग्न मोडलं..."
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर कनौजिया म्हणाले, मीडियाने माझे फोटो दाखवायला सुरुवात केला आणि सैफ अली खानवरील हल्ल्यातील मी मुख्य आरोपी असल्याचा दावा केला गेला. हे पाहून माझ्या कुटुंबाला धक्का बसला. कुटुंबातले लोक रडायला लागले. मुंबई पोलिसांच्या एका चुकीमुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. सैफच्या इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीला मिशा नव्हत्या. माझ्या मिशा आहेत हे पोलिसांच्या लक्षात आलं नाही. सैफवरील हल्ल्यानंतर, मला पोलिसांचा फोन आला आणि मी कुठे आहे असे विचारले. मी त्यांना सांगितलं की मी घरी आहे. त्यानंतर माझा फोन कट झाला. जेव्हा मला दुर्गमध्ये ताब्यात घेण्यात आले तेव्हा मी माझ्या होणाऱ्या पत्नीला भेटायला जात होतो.
हे ही वाचा >> Chhaava Movie : ट्रेलरनंतर वादात सापडलेला 'छावा' चित्रपट प्रदर्शीत करण्यासाठी मंत्री सामंतांनी यांनी ठेवली 'ही' अट
पोलिसांनी मला ताब्यात घेऊन रायपूरला नेलं. त्यानंतर मुंबई पोलिसांची टीम तिथे पोहोचली. मला मारहाण करण्यात आली. पोलिस कोठडीतून सुटल्यानंतर, माझ्या आईने मला घरी येण्यास सांगितलं, पण तोपर्यंत माझं आयुष्य उध्वस्त झालं होतं.
कनौजिया म्हणाले, जेव्हा मी माझ्या मालकाला फोन केला तेव्हा त्याने मला कामावर येऊ नको असे सांगितले. त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही. माझ्या आजीने मला सांगितलं की, माझ्या अटकेमुळे मुलीच्या कुटुंबाने लग्न रद्द केलं. माझ्या भावाचा दीर्घ उपचारानंतर मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबाला विरारमधील त्यांचं घर विकून कफ परेडमधील चाळीत राहावं लागतंय. माझ्याविरुद्ध कफ परेडमध्ये दोन आणि गुडगावमध्ये एक खटला दाखल आहे. पण याचा अर्थ असा नाही की, मला संशयित म्हणून ताब्यात घ्यावं आणि नंतर इतक्या वाईट स्थितीत सोडून द्यावं.
"मी सैफच्या घराबाहेर उभा राहून..."
कनौजिया पुढे म्हणाले, मी सैफ अली खानच्या इमारतीबाहेर उभा राहून जाब विचारेन. माझ्यासोबत जे काही घडलं, त्यामुळे मी सर्वस्व गमावलं आहे. शरीफुल सापडला, ही देवाची कृपा. नाहीतर मलाच या प्रकरणात आरोपी बनवलं गेलं असतं.