T20 WC, Ind Vs Pak: ‘रोहितला टीममधून ड्रॉप करणार?’, पत्रकाराच्या प्रश्नावर विराट भडकला अन् नंतर…

मुंबई तक

• 05:33 AM • 25 Oct 2021

T20 WC, Ind Vs Pak: T20 विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. विश्वचषक सामन्यांमध्ये ही पहिलीच वेळ आहे की, जेव्हा पाकिस्तानकडून भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. सामना संपल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्याला काही असे प्रश्न विचारण्यात आले की, तो स्वत:च चकित झाला. जेव्हा एका पत्रकाराने टीम इंडियाच्या […]

Mumbaitak
follow google news

T20 WC, Ind Vs Pak: T20 विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. विश्वचषक सामन्यांमध्ये ही पहिलीच वेळ आहे की, जेव्हा पाकिस्तानकडून भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. सामना संपल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्याला काही असे प्रश्न विचारण्यात आले की, तो स्वत:च चकित झाला. जेव्हा एका पत्रकाराने टीम इंडियाच्या प्लेइंग-11 वर प्रश्न उपस्थित केला तेव्हा विराटचा एक वेगळाच अंदाज सगळ्यांना पाहायला मिळाला.

हे वाचलं का?

पत्रकार परिषदेत एका पाकिस्तानी पत्रकाराने विराट कोहलीला थेट विचारले की, टीम इंडियाच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, रोहित शर्माच्या जागी इशान किशनला आणता आले असते का? तुम्ही पुढील सामन्यात रोहित शर्माला ड्रॉप करणार का?

या प्रश्नावर विराट कोहली हा सुरुवातीला खूपच संतापलेला दिसला. तो काही वेळ त्या पत्रकाराकडे रोखूनच पाहत होता. नंतर तो पत्रकाराला असं म्हणाला की, ‘हा खूप धाडसी प्रश्न आहे.’

पाकिस्तानी पत्रकाराला विराट कोहलीने काय दिलं उत्तर?

रोहित शर्माला संघातून ड्रॉप करणार का? या प्रश्नावर उत्तर देताना विराट कोहली हा सुरुवातीला संतापला.. नंतर तो पत्रकाराकडे रोखून पाहत होता. पण काही वेळाने विराटने त्याला उत्तर देताना प्रतिप्रश्न केला.

‘तुम्ही काय कराल? मी माझ्या सर्वोत्तम संघासोबत खेळलो आहे. तुम्ही रोहित शर्माला टी-20 संघातून ड्रॉप कराल का? त्याने मागच्या सामन्यात त्याने काय केले माहीत आहे का? (यानंतर विराट खाली पाहत हसतच राहिला) विराट पुढे म्हणाला की, तुम्हाला काही वाद हवा असेल तर थेट सांगा, मी तुम्हाला तसेच उत्तर देईन.’

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यानंतर विराट कोहली म्हणाला की, ‘आम्ही आमचे प्लॅन नीट राबवू शकले नाही, त्यामुळेच पाकिस्तानने आमचा पराभव केला. जेव्हा तुम्ही झटपट तीन विकेट गमावता, तेव्हा सामन्यात पुनरागमन करणे खूप कठीण होते. आम्हाला माहित होतं की दव पडणार आहे. त्यामुळेच आमच्यावर दबाव अधिक होता.’

विराट कोहली पुढे असंही म्हणाला की, ‘पाकिस्तानने आमच्यापेक्षा चांगला खेळ केला, ज्या प्रकारे परिस्थिती बदलली, आम्हाला आणखी 10-20 धावांची गरज होती.’ कर्णधार विराट कोहलीने मात्र हे देखील सांगितले की, हा पराभव काही आमच्यासाठी पॅनिक बटण मोड नाही, स्पर्धा नुकतीच सुरू झाली आहे, ती अद्याप संपलेली नाही.

टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध सामना मैदानात नाही तर ‘इथे’च हरला?

भारताने विश्वचषकातील आपल्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला 152 धावांचे लक्ष्य दिले होते. जे पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केले. या सामन्यात विराट कोहली आणि रिषभ पंत वगळता एकाही भारतीय फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. भारताची सलामी जोडी तर पूर्णपणे अपयशी ठरली. आपल्या पहिल्याच चेंडूवर रोहित शर्मा बाद झाला. तेव्हापासूनच भारतीय संघ दबावात आला.

    follow whatsapp