वॉश्गिंटन: P&G कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या भारतीय व्यक्तीला CEO बनवले जात आहे. या पदासाठी निवड झालेल्या व्यक्तीचे नाव शैलेश जेजुरीकर आहे. 58 वर्षीय शैलेश 1 जानेवारी 2026 रोजी अधिकृतपणे पदभार स्वीकारतील. सध्याचे सीईओ जॉन मोलर कार्यकारी अध्यक्षपदी रूजू होतील, जिथे ते संचालक मंडळाचे नेतृत्व करतील आणि जेजुरीकर यांना सल्ला देतील. कंपनीने सांगितले की, मोलर यांच्या कार्यकारी अध्यक्षपदाच्या कार्यकाळासाठी कोणतीही कालमर्यादा नाही. P&G बोर्ड ते या पदावर किती काळ राहतील हे ठरवेल.
ADVERTISEMENT
जाणून घ्या शैलेश जेजुरीकरांविषयी
हैदराबाद पब्लिक स्कूलचे माजी विद्यार्थी (आणि मायक्रोसॉफ्टचे CEO सत्य नाडेला यांचे वर्गमित्र), मुंबई विद्यापीठ आणि IIM लखनऊ (1989) जेजुरीकर हे जॉन मोलर यांची जागा घेतील. असे कंपनीने जाहीर केले आहे. 187 वर्षे जुन्या कंपनीचे ते पहिले आशियाई आणि भारतीय CEO असतील, ज्यांचे शिक्षण पूर्णपणे भारतीय शिक्षण प्रणालीतून झाले आहे.ृ
हे ही वाचा>> Personal Finance: रिटायरमेंट फंडचा सीक्रेट फॉर्म्युला, प्रत्येक जण विचारेल तुम्ही करोडपती कसे बनला?
अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या कारकिर्दीपूर्वी ही कंपनी स्थापन झाली होती. P&G ची स्थापना 1837 मध्ये इंग्लंडमध्ये जन्मलेल्या मेणबत्ती निर्माता विल्यम प्रॉक्टर आणि आयर्लंडमध्ये जन्मलेल्या साबण निर्माता जेम्स गॅम्बल यांनी केली होती. 1999 ते 2000 दरम्यानच्या अल्प कालावधीसाठी, जेव्हा P&G चे नेतृत्व नेदरलँड्समध्ये जन्मलेल्या डर्क जेगर यांनी केले होते, जेजुरीकर हे कंपनीचे नेतृत्व करणारे दुसरे बिगर-अमेरिकन सीईओ असतील.
जेजुरीकर यांनी त्यांचे बालपण भारतात घालवले आहे. 2023 च्या P&G अॅल्युमनी पॉडकास्टमध्ये त्यांनी सांगितले की, त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण मुंबई बाहेरील एका भागात सुरू केले होते. त्यांनी सांगितले की जवळची शाळा 45 मिनिटांच्या अंतरावर होती. आठवी इयत्ता असताना ते हैदराबादला गेले आणि बोर्डिंग स्कूलमध्ये ज्युनियर म्हणून प्रवेश घेतला.
जेजुरीकर म्हणालेले की, हैदराबादमधील त्यांच्या हायस्कूलच्या वर्षांनी त्यांना स्वतःला शोधण्यात खरोखर मदत केली. त्यांनी स्वत:ला क्रिकेटमध्ये चाचपून पाहिले, जिथे ते उत्कृष्ट होते आणि दर रविवारी मोठ्या क्रिकेट स्पर्धा खेळत असत. बारावीच्या वर्गात त्यांना शाळेचा हेड बॉय बनवण्यात आलं होतं, ज्यामुळे त्यांना नेतृत्वाची खरी संधी मिळालेली.
जेजुरीकर यावेळी असंही म्हणालेले की, त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा धडा त्यांना हेड बॉय असताना मिळाला होता. सामान्यतः विद्यार्थी सकाळी उठायचे, PE (शारीरिक शिक्षण) मध्ये जायचे, नंतर वसतिगृहात परत यायचे, आंघोळ करायची आणि अभ्यासाच्या वेळेस जायचे.
हे ही वाचा>> Personal Finance: घर घेताना स्टॅम्प ड्युटी भरली तर तुम्हाला Tax मध्ये मिळेल चांगली सूट
हेड बॉय म्हणून, जेजुरीकर यांचे काम प्रत्येकाच्या खोल्या व्यवस्थित आहेत आणि बेड व्यवस्थित आहेत याची खात्री करणे होते. पीईला जाण्यापूर्वी ते सहसा दररोज सकाळी त्यांचे बेड तयार करायचे, परंतु एके दिवशी ते घाईत होते आणि ते बेड व्यवस्थित करण्यास विसरले. जेव्हा ते इतर विद्यार्थ्यांच्या खोल्या स्वच्छ केल्या आहेत की नाही हे पाहण्यासाठी तपासत होता तेव्हा त्यांना लक्षात आले की ते त्याचा बेड व्यवस्थित करायला विसरले आहेत.
जेजुरीकर म्हणाले की, त्यांना नंतर कळलं की त्यांच्या रसायनशास्त्राच्या शिक्षकाला ही चूक लक्षात आली होती, त्यांनीच जेजुरीकर यांचा बेड व्यवस्थित करून ठेवला. पण त्यांनी याबाबत जेजुरीकरांना त्याबद्दल काहीही सांगितले नव्हते - कोणतीही टिप्पणी केली नाही किंवा त्याबाबत ते त्यांना काहीही बोलले नाही.
"यामुळे मला सर्वात मोठा धडा मिळाला. मी यातून शिकलो की कधीही कोणाला असे काम करण्यास सांगू नका जे तुम्ही स्वतः करू शकत नाही."
जेजुरीकर मुंबईतील महाविद्यालयात गेले आणि नंतर लखनऊमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए केले. P&G ने त्यांना 1989 मध्ये असिस्टंट ब्रँड मॅनेजर म्हणून नियुक्त केले आणि तेव्हापासून ते जगभरातील विविध शहरांमध्ये कंपनीसाठी काम करत आहेत.
शैलेश जेजुरीकर यांना आता किती पगार मिळणार?
P&G कंपनीने जेजुरीकर यांना 1.6 दशलक्ष डॉलर्स पगार आणि 3.2 दशलक्ष डॉलर्सचा संभाव्य बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाने त्यांना 14 दशलक्ष डॉलर्सची दीर्घकालीन इक्विटी देखील दिली आहे, जी कामगिरी शेअर्स आणि दीर्घकालीन प्रोत्साहन पुरस्कारांमध्ये समान प्रमाणात विभागली जाते.
ADVERTISEMENT
