Crime News : पॉर्न वेबसाईट आणि सोशल मीडियावर अनेकदा जोडप्यांचे व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. पण हेच व्हिडिओ व्हायरल होण्याचं कारण हे अनेकदा जोडपेच असतात. काही वेळा त्यांचे अश्लील कृत्य काही लोक आपल्या कॅमेऱ्यात देखील कैद करताना दिसतात आणि नंतर व्हायरल करतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्सप्रेसमध्ये घडली आहे. याची सध्या जोरदार चर्चा होताना दिसते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : "चल तुला शाळेत सोडतो" असं सांगून चिमुरडीला खोलीत नेलं... पुण्यातील लाज आणणारा प्रकार
अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा आरोप
आशुतोष सरकार या तरुणावर जोडप्यांचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा आरोप करण्यात आला आहे. तो पूर्वांचल एक्सप्रेवेवरील टोल प्लाझावर अँटी-ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीमचा असिस्टंट मॅनेजर होता. आशुतोष ज्या कंपनीत कार्यरत होता त्याच कंपनीने त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते. ही घटना हलियापूर परिसरातील आहे.
एक्सप्रेसवेच्या देखरेख यंत्रणेचा गैरवापर
पूर्वांचल एक्सप्रेसवेवरील टोल प्लाझावर एटीएम सिस्टीम बसवण्यात आली आहे. ज्याचा वापर हा वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जातो. या सिस्टीमद्वारे, एक्सप्रेसवेवरील बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे वाहनांचे निरीक्षण केले जाते. पण, आता एटीएमचे सहाय्यक व्यवस्थापक आशुतोष सरकार यांनी एक्सप्रेसवेच्या देखरेख यंत्रणेचा गैरवापर केला.
जोडप्यांनी जवळीक साधतानाचे व्हिडिओ फुटेज
एक्सप्रेसवेवर जोडप्यांच्या वाहनांमध्ये जवळीक साधतानाचे व्हिडिओ फुटेज आशुतोष काढत असे. तो प्रवाशांना ब्लॅकमेल करायचा आणि नंतर पैसे उकळायचा, नंतर व्हिडिओ व्हायरल करायचा. आशुतोष विश्वास यांनी हलियापूर एक्सप्रेसवेजवळील गावांमधील महिला आणि मुलींना असंच टार्गेट केल्याचा आरोप आहे. त्यांच्या बाहेर शौच करतानाचे व्हिडिओ बनवून ते व्हायरल केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
अशातच कोणतेही खासगी किंवा अंतरंग व्हिडिओ गुप्तपणे रेकॉर्ड करण्यात आले असतील आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले असतील. तसेच स्वत:चे संरक्षण करण्यासाठी तात्काळपणे कायदेशीर उपाय करावा. तुमच्या स्थानिक पोलीस ठाणे किंवा सायबर क्राइम सेलमध्ये ताबडतोब एफआरआय दाखल करा.
हे ही वाचा : पालकांनीच कुशीत झोपवलं 23 दिवसांचं बाळ, श्वास घेण्यास होऊ लागला त्रास, डोळे बंदच... चटका लावणारी घटना
व्हिडिओ तयार करणाऱ्या, लीक करणाऱ्या आणि ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करता येईल. व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या आणि प्रसारित करणाऱ्यांवर माहिती तंत्रक्षान कायदा 2000 अंतर्गत विविध आरोप लागू शकतात.
कलम 66E आहे, ज्यामध्ये तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची तरतूद
अश्लील व्हिडिओ-फोटो व्हायरल केल्यास 5-7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे.
आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 354C आणि 509 (महिलेच्या विनयभंग) द्वारे देखील गुन्हे दाखल केले.
व्हिडिओ व्हायरल झालेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर किंवा वेबसाइटवर त्वरित तक्रार करा.
ADVERTISEMENT











