"चल तुला शाळेत सोडतो" असं सांगून चिमुरडीला खोलीत नेलं... पुण्यातील लाज आणणारा प्रकार

मुंबई तक

Pune Crime : पुण्यातील विश्रांतवाडीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे वृत्त आहे.

ADVERTISEMENT

Pune crime
Pune crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यातील विश्रांतवाडीत एक धक्कादायक घटना

point

'चल शाळेत सोडतो' असं सांगत आरोपीने तिला खोलीत नेलं..

Pune crime : पुण्यातील विश्रांतवाडीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे वृत्त आहे. या प्रकरणातील आरोपीचे नाव मुनाकिब नासिर अन्सारी असे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. ही धक्कादायक घटना 4 डिसेंबर रोजी घडली आहे. या घटनेनं परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. 

हे ही वाचा : पालकांनीच कुशीत झोपवलं 23 दिवसांचं बाळ, श्वास घेण्यास होऊ लागला त्रास, डोळे बंदच... चटका लावणारी घटना

'चल शाळेत सोडतो' असं सांगत आरोपीने तिला खोलीत नेलं..

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव मुनाकिबा अन्सारी असे आहे. तो महाविद्यालयीन विद्यार्थी असून त्याची आणि पीडित मुलीची बस स्टॉपवर ओळख झाली होती. त्याने तिला शाळेत सोडण्याचे आश्वासन दिले आणि आपल्या मोटारसायकलवर बसवले होते. मात्र, शाळेत न जाता, आरोपी तिला एका खोलीत घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली.

पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या 

अत्याचारानंतर पीडित तरुणीने कुटुंबीयांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी नंतर विश्रांतवाडी पोलीस ठाणे गाठत घटनेचा सर्व प्रकार सांगितला होता. एकूण घडलेल्या घटनेची पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी काही वेळातच तपास सुरु केला. तपासानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

हे ही वाचा : विधवेसोबत लिव्ह-इन रिलेशनशिप, घरात सीसीटीव्ही कॅमेरे, महिलेच्या मुलीसोबत... अखेर प्रियकराचा गळा चिरून अंत

या प्रकरणी आता विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपीविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झाले असून यामुळे आता महिलांच्या सुरक्षिततेबाबतचा प्रश्न आता पुन्हा नव्याने समोर आला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp