पुणे मेट्रो लाईन 4 ची प्रतिक्षा संपली, आता घरापर्यंत पोहोचणार? महत्त्वाची अपडेट

Pune News : पुणे शहरात लोकसंख्येवर तोडगा म्हणून मेट्रो रेल्वेचा मोठ्या प्रमाणात विस्तार होऊ लागला आहे, त्याची अपडेट पुढीलप्रमाणे...

Pune News

Pune News

मुंबई तक

• 07:39 PM • 09 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुणे शहरात मेट्रो रेल्वेचा मोठ्या प्रमाणात विस्तार

point

जोडणारे 'हे' मार्ग पुणे शहरासाठी महत्त्वपूर्ण

Pune News : पुणे शहरात देखील लोकसंख्येत वाढ होऊ लागलेली आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने देखील पुणे शहर मोठं होऊ लागलं आहे. याचाच विचार करता शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीच्या समस्या समोर येऊ लागल्या आहेत. हिच बाब लक्षात घेता, यावर एक समस्या आणि त्यावरील कायमस्वरुपी तोडगा म्हणून मेट्रो रेल्वेचा मोठ्या प्रमाणात विस्तार होऊ लागला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : "चल तुला शाळेत सोडतो" असं सांगून चिमुरडीला खोलीत नेलं... पुण्यातील लाज आणणारा प्रकार

पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला अंतिम मंजुरी

महत्त्वाची बाबत म्हणजेच नुकतेच केंद्र सरकारने पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला अंतिम मंजुरी देण्याचे काम केलं आहे. याच टप्प्यात लाईन 4 खडकवासला ते खारडी आणि लाईन 4A नळ स्टॉप ते माणिक बाग या दोन महत्त्वाच्या मार्गांचा समावेश करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. 

जोडणारे 'हे' मार्ग पुणे शहरासाठी महत्त्वपूर्ण

अशातच आता पुणे मेट्रो फेज 2 अंतर्गत सुरु होणाऱ्या मेट्रो लाईफ 4, शहराच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिण-पश्चिम भागांना जोडले जाणार आहे. खडकवासला, स्वारगेट, हडपसर आणि खराडीसारख्या भागांना जोडणारा हा एक नवीन मेट्रो मार्ग पुणे शहरासाठी अगदीच फायदेशीर असणार आहे. 

हे ही वाचा : पालकांनीच कुशीत झोपवलं 23 दिवसांचं बाळ, श्वास घेण्यास होऊ लागला त्रास, डोळे बंदच... चटका लावणारी घटना

संबंधित प्रकल्पाबाबत सूत्रांकडून माहिती आहे की, दोन्ही कॉरिडॉर  सुमारे 31.64 किमी लांबीचे असण्याची शक्यता आहे. तसेच यावर एकूण 28 अत्याधुनिक स्टेशन्स बांधण्याचे काम होईल, असे सांगण्यात येत आहे.  आयटी हब म्हणून ओळखले जाणारं खराडी, तसेच मगरपट्टा-हडपसर, खडकवासला, सिंहगड रोडसारखी महत्त्वाची निवासी क्षेत्रे थेट जोडली जाणार आहेत. 

    follow whatsapp