Maharashtra Weather : राज्यात पावसाचं होणार कमबॅक, पुढील काही तास महत्त्वाचे

मुंबई तक

• 05:00 AM • 26 Aug 2026

Maharashtra Weather : राज्यात काही ठिकाणी पावसाचा जोर असण्याची शक्यता आहे, तर काही भागांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविलेला आहे. 26 ऑगस्ट रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज घ्या जाणून.

Maharashtra Weather

Maharashtra Weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात काही ठिकाणी पावसाचा जोर असण्याची शक्यता

point

काही भागांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज

Maharashtra Weather : राज्यात काही ठिकाणी पावसाचा जोर असण्याची शक्यता आहे, तर काही भागांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविलेला आहे. हवामान विभागाने राज्यातील चार जिल्ह्ये आणि घाटमाथा परिसरातील भागांमध्ये पावसाचा यलो अलर्टचा अंदाज जारी केलेला आहे. अशातच जाणून घ्या 26 ऑगस्ट रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : नांदेड हादरलं! चॉकलेटचं आमिष दाखवत तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र 

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कमी असण्याची शक्यता आहे. घाटमाथा परिसरात ढगांची अधिक दाटी असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. सर्वच भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता परिस्थितीनुसार आहे. पुणे जिल्ह्यातील घाटमाथा पावसाच्या दृष्टीने अधिक सक्रिय राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने या भागांसाठी यलो अलर्टचा अंदाज वर्तविलेला आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. काही ठिकाणी विजांसह पावसाची स्थिती आहे. नाशिक जिल्ह्यातही पावसाचा अंदाज आहे, तसेच नाशिक घाटमाथा परिसरात पावसाचा अधिक जोर वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी घाट परिसरातून प्रवास करताना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आलेय. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड येथे विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. धाराशिव जिल्ह्यात पावसाचा कोणताही अलर्ट वर्तविलेला नाही. 

हे ही वाचा : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना दिलासा मिळणार? 17 वर्षे जुन्या प्रकरणाचा निकाल ठरला!

विदर्भ 

विदर्भ विभागात भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान विभागाने कोणताही अलर्ट वर्तविलेला नाही.