30 नोव्हेंबर रोजी ChatGPT सुरू होऊन तीन वर्ष पूर्ण झाली. हे पहिलं Generative AI App आहे. तेव्हापासून, AI अॅप किंवा त्यासंबंधी गोष्टींमध्ये वेगाने वाढ झाली आहे. आपला तिसरा वर्धापन दिन साजरा करण्याऐवजी, ChatGPT तयार करणारी कंपनी Open AI ने धोक्याचा इशारा दिला आहे. Open AI चे संस्थापक सॅम ऑल्टमन यांनी कोड रेड वॉर्निंग जारी केली आहे. ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सर्व नवीन काम थांबवून ChatGPT वर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे, कारण Google Gemini आणि Claude सारखे Apps आता त्यांच्याशी स्पर्धा करत आहेत. आज, आपण ChatGPT आणि Google Gemini मध्ये कोण चांगलं ते जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
कोणता AI मॉडेल चांगला आहे? यासाठी एक परीक्षा असते. Humanities Last Exam असं या परीक्षेचं नाव आहे. प्रत्येक प्रमुख विषयातील तज्ज्ञ पेपर तयार करतात. अडीच ते तीन हजार प्रश्न असतात. या परीक्षेत Gemini ने 37% गुण मिळवले, तर ChatGPT ने 31% गुण मिळवले, म्हणजे Gemini ने आघाडी घेतली आहे.
पण परीक्षेशी आपला काय संबंध? आपल्याला तर याचा वापर दैनंदिन कामांमध्ये करायचा आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर, Gemini हा विज्ञानाचा चांगला विद्यार्थी आहे, तर ChatGPT हा लिबरल आर्ट्स शाखेचा विद्यार्थी आहे. Gemini आकडेवारीशी खेळू शकतो, तर ChatGPT शब्दांमध्ये चांगला आहे. याचा अर्थ असा नाही की ChatGPT गणितात कमकुवत आहे किंवा Gemini भाषेत कमकुवत आहे.
ChatGPT 'ही' 3 कामं करू शकतं अगदी चांगली
ChatGPT तुमच्यासाठी तीन कामे चांगली करू शकतो. ती म्हणजे लेखन, ईमेल आणि लेख. दुसरे काम समजावून सांगणे, एका चांगल्या शिक्षकाप्रमाणे, ते जटिल विषय सोप्या भाषेत समजावून सांगू शकतं. तिसरे काम सल्लागाराचे आहे, जसे की करिअरसंबंधी CV तयार करण्यात मदत करणे किंवा मुलाखतीची तयारी करण्यास तुम्हाला मदत करू शकतं.
Gemini 'ही' 3 कामं करू शकतं अगदी चांगली
आता Gemini च्या तीन कामांबद्दल बोलूया. ते तुम्हाला वित्त, व्यवसाय आणि गुंतवणूक यासारख्या बाबींमध्ये निर्णय घेण्यास मदत करू शकते. Google चा रिअल-टाइम डेटा हा अधिक चांगले बनवतो. दुसरे काम म्हणजे अहवाल वाचणे. ते Multi Model आहे, म्हणजे त्यात फोटो, व्हिडिओ, ऑडिओ आणि मजकूर यासारखे वेगवेगळे इनपुट एकाच वेळी समजून घेण्याची क्षमता आहे. सर्व काही गोष्टी लिहून सांगण्याची त्याला गरज नाही. Gemini तिसरं चांगलं काम करू शकतं ते म्हणजे ट्रॅव्हल एजंटचे. तुमचे Gemail कॅलेंडर त्याला माहिती आहे. तुमच्या बुकिंगमध्ये मदत करण्यासाठी त्यात Google Flights रिअल-टाइम डेटा आहे. तुम्हाला फक्त पैसे द्यावे लागतील.
निर्णय तुमचा आहे. मी दोन्हीचे फायदे स्पष्ट केले आहेत. माझा सल्ला असा आहे की त्यांचा वापर सुरू करा, परंतु लक्षात ठेवा की AI चुका करू शकते आणि त्याला सर्वकाही माहिती नसते. सध्या, त्याच्या परीक्षेतील मार्क हे उत्तीर्ण होण्याच्या टक्केवारी एवढे आहेत.
ADVERTISEMENT











