WTC Final : न्यूझीलंडचंही दमदार पुनरागमन, डेवॉन कॉनवेची हाफ सेंच्युरी

मुंबई तक

• 05:46 PM • 20 Jun 2021

वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपमध्ये टीम इंडियाला पहिल्या इनिंगमध्ये २१७ रन्सवर रोखण्यात यश आल्यानंतर न्यूझीलंडने तिसऱ्या दिवसाअखेरीस २ विकेट गमावत १०१ रन्सपर्यंत मजल मारली आहे. डेवॉन कॉनवेच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर न्यूझीलंडने तिसऱ्या दिवसाअखेरीस शतकी टप्पा ओलांडला. तिसऱ्या दिवशी सुरुवातीच्या काही ओव्हर्स सोडल्यानंतर भारताने निराशाजनक कामगिरी केली. विराट कोहली जेमिसनच्या बॉलिंगवर ४४ रन्सवर आऊट झाला. यानंतर मैदानात आलेला […]

Mumbaitak
follow google news

वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपमध्ये टीम इंडियाला पहिल्या इनिंगमध्ये २१७ रन्सवर रोखण्यात यश आल्यानंतर न्यूझीलंडने तिसऱ्या दिवसाअखेरीस २ विकेट गमावत १०१ रन्सपर्यंत मजल मारली आहे. डेवॉन कॉनवेच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर न्यूझीलंडने तिसऱ्या दिवसाअखेरीस शतकी टप्पा ओलांडला.

हे वाचलं का?

तिसऱ्या दिवशी सुरुवातीच्या काही ओव्हर्स सोडल्यानंतर भारताने निराशाजनक कामगिरी केली. विराट कोहली जेमिसनच्या बॉलिंगवर ४४ रन्सवर आऊट झाला. यानंतर मैदानात आलेला ऋषभ पंतही फारशी चमक न दाखवता लगेच माघारी परतला. दुसरीकडे व्हाईस कॅप्टन अजिंक्य रहाणे एक बाजू सांभाळून खेळत होता, परंतू वॅगनरने लावलेल्या जाळ्यात तो अडकला. अवध्या एका रनने अजिंक्यची हाफ सेंच्युरी हुकली. ११७ बॉलमध्ये ५ फोरच्या सहाय्याने त्याने ४९ रन्स केल्या.

अजिंक्य रहाणे आऊट झाल्यानंतर आश्विन-जाडेजा जोडीने टीम इंडियाला द्विशतकी टप्पा ओलांडून दिला. परंतू टीम इंडियाच्या शेपटाला झटपट गुंडाळण्यात न्यूझीलंडला यश आलं. जेमिसनने ५ विकेट घेत भारतीय बॅट्समन मोठी धावसंख्या उभारणार नाहीत याची काळजी घेतली.

प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडच्या बॅट्समननीही चांगली सुरुवात केली. टॉम लॅथम आणि डेवॉन कॉनवे जोडीने पहिल्या विकेटसाठी ७० रन्सची पार्टनरशीप केली. तिसऱ्या दिवसाअखेरपर्यंत न्यूझीलंडची ही जोडी भारताला अडचण निर्माण करणार असं वाटत असतानाच आश्विनने टॉम लॅथमला आऊट केलं. यानंतर कॉनवेने कॅप्टन विल्यमसनच्या साथीने आपलं अर्धशतक साजरं केलं. इशांत शर्माने ५४ रन्सवर कॉनवेची इनिंग संपवली. त्यामुळे उद्याच्या दिवशी टीम इंडिया न्यूझीलंडच्या बॅट्समनला झटपट गुंडाळण्यात यशस्वी ठरते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp