Naseem Khan : वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने नाराज, बड्या नेत्याचा स्टार प्रचारक पदाचा तडकाफडकी राजीनामा

Naseem khan has resigned as congress star campaigner : पक्षाने मला उत्तर मध्य लोकसभा मतदार संघातून लढण्याची सूचना केली होती. पक्षाच्या आदेशानुसार मी तयारी देखील केली होती. परंतू असे असताना पक्षाने मला संधी न देता वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली. त्यामुळे निश्चितच मी नाराज आहे.

मुस्लिम समाजाची मते घ्यायची मात्र त्यांना प्रतिनिधित्व द्यायचे नाही, असे पक्षाचे धोरण आहे काय?

naseem khan has resigned as congress star campaigner varsha gaikwad north central lok sabha election

सौरभ वक्तानिया

26 Apr 2024 (अपडेटेड: 26 Apr 2024, 10:25 PM)

follow google news

Naseem khan has resigned as congress star campaigner : मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघातून काँग्रसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ही उमेदवारी जाहीर झाल्याला 24 तास उलटण्याआधीच बंडखोरी झाली आहे.  काँग्रेस नेते आणि माजी मंत्री नसीम खान यांनी स्टार प्रचारक पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. खरं तर मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघातून नसीम खान लोकसभा लढवण्यास इच्छुक होते. मात्र ऐनवेळी वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्याने नसीम खान नाराज झाले असून आता त्यांनी काँग्रेसच्या तीन कमिटी आणि स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिला आहे.त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.  (naseem khan has resigned as congress star campaigner varsha gaikwad north central lok sabha election) 

हे वाचलं का?

पक्षाने मला उत्तर मध्य लोकसभा मतदार संघातून लढण्याची सूचना केली होती. पक्षाच्या आदेशानुसार मी तयारी देखील केली होती. परंतू असे असताना पक्षाने मला संधी न देता वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली. त्यामुळे निश्चितच मी नाराज आहे. मुस्लिम समाजाची मते घ्यायची मात्र त्यांना प्रतिनिधित्व द्यायचे नाही, असे पक्षाचे धोरण आहे काय? असा प्रश्न राज्यातील मुस्लिम समाज मला विचारत आहे. त्यांच्या प्रश्नाचे मी काय उत्तर देऊ? असा सवाल विचारत ''उत्तर मध्य''मध्ये प्रचार करायचा का नाही? याचा निर्णय घेऊ, असे नसीम खान म्हणाले. 

हे ही वाचा : Nanded: कुऱ्हाडीने EVM फोडलं, मतदान केंद्रात भयंकर घटना...नेमकं काय घडलं?

नसीम खान यांच्या पत्रात काय?  

महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांवर महाविकास आघाडीने एकाही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिली नाही.  त्यामुळे काँग्रेसला फक्त मुस्लीम मतं हवी आहे, मग उमेदवार का नाही? असा सवाल नसीम खान यांनी खर्गेंना केला आहे.

महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी स्टार प्रचारकांच्या यादीत माझे नाव दिल्याबद्दल तुमचा आभारी आहे. पण मी तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही, असे नसीम खान यांनी पत्रात सांगितले आहे.  आणि महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 च्या प्रचार समितीसह तीन वेगवेगळ्या समितीचा राजीनामा दिला. 

हे ही वाचा : "असं होतं का?", ठाकरेंना विश्वजित कदमांचा संतप्त सवाल

जीनाम्याची सांगितली कारणे 

लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी महाविकास आघाडीने महाराष्ट्रात एकाही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिलेली नाही. महाराष्ट्रातील अनेक मुस्लिम संघटना, नेते आणि पक्ष कार्यकर्त्यांना काँग्रेस किमान 1 उमेदवार देईल अशी अपेक्षा होती. पण दुर्दैवाने काँग्रेसने एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही. त्यामुळे काँग्रेसला फक्त मुस्लीम मतं हवी आहे, मग उमेदवार का नाही? असा सवाल नसीम खान यांनी खर्गेंना केला आहे. 

मी काँग्रेस पक्षांच्या निर्णयावर नाराज आहे. दरम्यान याआधी जेव्हा-जेव्हा पक्षाने मला गुजरात, गोवा, कर्नाटक, तेलंगणा, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि इतर राज्यांच्या निवडणुकीची जबाबदारी दिली होती. ती मी यशस्वीरीत्या पार पाडली आहे, असे नसीम खान यांनी सांगितले आहे. 

    follow whatsapp