'पनवेलमध्ये पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकली', शेकाप माजी आमदार बाळाराम पाटील संतापले

Panvel Muncipal corporation : पैशांच्या बळावर भाजपने ही निवडणूक जिंकली असल्याचा आरोप पनवेलचे शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केला आहे. त्यांनी भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाऊ परेश ठाकूरवरही गंभीर आरोप केले आहेत.

Panvel Muncipal corporation

Panvel Muncipal corporation

मुंबई तक

02 Jan 2026 (अपडेटेड: 02 Jan 2026, 05:57 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

'पैशांच्या बळावर भाजपने ही निवडणूक जिंकली'

point

शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांचा आरोप

point

'हे' उमेदवार विजयी

Panvel Muncipal corporation : पैशांच्या बळावर भाजपने ही निवडणूक जिंकली असल्याचा आरोप पनवेलचे शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केला आहे. त्यांनी भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाऊ परेश ठाकूरवरही गंभीर आरोप केले आहेत. महानगरपालिका निवडणूक होऊन काही वर्षे झाले होते. त्यानंतरही परेश ठाकूर हे महापालिकेच्या पैशांचा वापर करत असल्याचा आरोप बाळाराम पाटील यांनी केला. ते माध्यमांशी दि : 2 जानेवारी शुक्रवारी बोलताना म्हणाले होते.

हे वाचलं का?

हे ही वाचा : काका, भाऊ आणि वडील ग्राहकांना घरी बोलावतात नंतर आमच्यासोबतच... 'या' समाजात लेकींना ढकललं जातं वेश्याव्यवसायात

पैशांचा वापर करून पनवेलची महायुती महाविकास आघाडीला घाबरवत असल्याचा आरोप बाळाराम पाटील यांनी केला आहे. याबाबत त्यांनी तक्रार देखील केली आहे. अशातच आता एकूण पाच नगरसेवक हे बिनविरोध निवडून आल्याची माहिती समोर आली आहे. त्या नगरसेवकांची नावे आता समोर आलेली आहेत. 

विजयी उमेदवारांची नावे : 

नितीन पाटील

रुचिता लोंढे

अजय बहिरा

दर्शना भोईर

प्रियंका कांडपिळे अशी विजयी उमेदवारांची नावे आता समोर आलेली आहेत. 

हे ही वाचा : पुण्यात विधवा महिलेनं जीन्स घातली म्हणून दीरानं वहिनीचा मोडला हात, पुरोगामी महाराष्ट्रात लाज आणणारा प्रकार

विरोधकांना धमक्या दिल्याचा आरोप 

भाजपचे आमदार विक्रांत पाटील हे देखील निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उपस्थित होते. तेच भाजपचे पाच उमेदवार हे विजयी झाले आणि त्यांच्याच प्रस्तावकांना धमकी देखील देण्यात आली होती. एवढंच नाहीतर शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षातील लोकांना देखील धमकावण्यात आल्याचं चित्र आता समोर आले आहे, असा गंभीर आरोप बाळाराम पाटील यांनी केल्याचं चित्र आहे. अशातच सध्या भाजप नेत्याकडून याबाबत कसलंही निवेदन जारी केलेलं नाही.

 

    follow whatsapp