महिलेने रागाच्या भरात लिव्ह इन पार्टरनला ड्रग्ज देऊन त्याचे गुप्तांग कापले, नंतर घटनास्थळावरून काढला पळ

crime news : महिलेने रागाच्या भरात तिच्या लिव्ह इन पार्टनरचे गुप्तांग कापल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जखमी झालेला पुरुष हा एक बनावट डॉक्टर आहे, ज्याने अलीकडेच दुसरा विवाह केला होता. याचमुळे महिला नाराज झाली होती. जखमी झालेला पुरुष स्वत:हून रुग्णालयात गेला होता. पुरुषाने शस्त्रक्रिया केली, दरम्यान पोलीस महिलेला शोध घेत आहेत.

crime news

crime news

मुंबई तक

28 Feb 2026 (अपडेटेड: 28 Feb 2026, 09:55 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

महिला पुरुषाशी लिव्ह इनमध्ये राहत होती

point

महिलेनं पुरुषाचे गुप्तांग छाटले 

Crime News : महिलेने रागाच्या भरात तिच्या लिव्ह इन पार्टनरचे गुप्तांग कापल्याची घटना दिल्लीतील वजीराबादमध्ये घडली. जखमी झालेला पुरुष हा एक बनावट डॉक्टर आहे, ज्याने अलीकडेच दुसरा विवाह केला होता. यामुळे महिला नाराज झाली होती. जखमी झालेला पुरुष स्वत:हून रुग्णालयात गेला होता. पुरुषाने शस्त्रक्रिया केली, दरम्यान पोलीस महिलेचा शोध घेत आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी महिलेचा शोध घेण्यासाठी बिहारमध्ये कटिहार येथे एक पथक पाठवले. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : अमरावती: दोन्ही भावांमध्ये चिकन खाण्यावरून वाद... रागाच्या भरात डोक्यात रॉड घालून 12 वर्षीय मुलाचा खून

महिला पुरुषाशी लिव्ह इनमध्ये राहत होती

घडलेल्या घटनेनुसार, जगतपूर गावातील रमेश (वय 22) एक बनावट डॉक्टर आहे. तो क्लिनिक चालवतो, त्याची दोन वर्षांपूर्वी दोन मुलांची आई असलेल्या शायराशी ओळख झाली आणि ते वझिराबादच्या रोड क्रमांक 9 मध्ये लिव्ह इनमध्ये राहू लागले. रमेशचे नुकतेच लग्न झाले होते, ज्यामुळे पत्नी शायराला वाईट अनुभव आला होता. 

महिलेनं पुरुषाचे गुप्तांग छाटले 

पोलिसांनी सांगितले की, हल्ला करण्यापूर्वी शायराने त्या व्यक्तीला ड्रग्ज दिले आणि नंतर संधी मिळताच तिने त्याचे गुप्तांग छाटले. हा तरुण गेल्या दोन वर्षांपासून वजिराबाद येथील रहिवासी असलेल्या आरोपी अमिना खातूनशी प्रेमसंबंधात होता. पीडितेनं आपल्या जबाबात म्हटलं की, तो 24 फेब्रुवारी रोजी दिल्लीत होता. त्याने दावा केला की, ते गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांच्या परिचयाचे होते. 

संबंधित प्रकरणात पोलिसांनी सांगितले की, संतप्त शायराने संधी साधून त्याचे गुप्तांग छाटून घटनास्थळावरून पळ काढला. शस्त्रक्रियेनंतर तरुणाचे अवयव पुन्हा जोडण्यात आले आणि आरोपी महिलेच्या शोधासाठी पोलिसांचे पथक घेऊन रवाना झाले होते. 

हे ही वाचा : कुंभ राशीत अंगारक योग निर्माण होणार, 'या' काही राशींना सतर्कतेचा इशारा

दरम्यान पीडित जखमी रमेशला सफरदजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पोलिसांनी रुग्णालयात येऊन वैद्यकीय अहवाल घेतला आणि पीडितेचा जबाब नोंदवला. पीडितेनं आरोप केला की, महिलेनं रात्री दुधात औषध मिसळले होते.