काका, भाऊ आणि वडील ग्राहकांना घरी बोलावतात नंतर आमच्यासोबतच... 'या' समाजात लेकींना ढकललं जातं वेश्याव्यवसायात

मुंबई तक

Crime News : बच्छाव समाजात एक वाईट प्रथा आजही आहे. त्याच प्रथेबाबत पीडितेनं न्याय व्यवस्थेला घडलेल्या घटनेची माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'आमच्या कुटुंबातील पुरुष काम करत नाहीत'

point

सर्वच मुली याच कामात गुंतून राहिल्या

Crime News : मध्य प्रदेशात एक मन सून्न करून टाकणारी घटना घडली आहे. बच्छाव समाजातील एका मुलीसोबत भयानक कृत्य घडलं आहे. तिने न्यायालयात धाव घेत आपल्यासोबत घडलेल्या घटनेचा पाढा वाचून दाखवल्याचं वृत्त समोर आलं आहे. बच्छाव समाजात एक वाईट प्रथा आजही आहे. त्याच प्रथेबाबत पीडितेनं न्याय व्यवस्थेला घडलेल्या घटनेची माहिती दिली आहे. याच प्रथेचे बंध तोडून रतलाम जिल्ह्यातील एक मुलगी भोपाळमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेली होती. त्यानंतर तिने माध्यमांशषी बोलताना सांगितलं की, स्थानिक पोलीस ऐकत नाहीत, असं तिचं म्हणणं होतं.

हे ही वाचा : पुण्यात विधवा महिलेनं जीन्स घातली म्हणून दीरानं वहिनीचा मोडला हात, पुरोगामी महाराष्ट्रात लाज आणणारा प्रकार

'आमच्या कुटुंबातील पुरुष काम करत नाहीत'

या प्रकरणात माध्यमाशी बोलताना पीडितेनं सांगितलं की, आमच्या कुटुंबातील पुरुष काम करत नाहीत. सर्व मुलींच्याच कमाईवर जगत असतात. ग्राहक शोधून आमच्या घरी आणले जाते. मुलीने नंतर सांगितलं की, मला वैश्याव्यवसायाच्या तावडीतून सुटायचे आहे. पीडितेनं भोपाळमधील महिला पोलीस ठाण्यात आई-वडिलांविरोधात आणि मामांविरोधात एफआरआय दाखल केला. नंचर तिच्या बहिणी देखील या प्रकरणात अडकून बसलेल्या आहेत. त्यांच बहि‍णींना यातून बाहेर काढायचे होते.

सर्वच मुली याच कामात गुंतून राहिल्या

मुलीने सांगितलं की, 'आमच्या गावातील सर्वच मुली याच कामात गुंतून राहिलेल्या होत्या. मी शाळेत जायचे तेव्हा मला 14 व्या वर्षी मला वैश्यव्यवसायात ढकललं. घरामध्ये असे ग्राहक आणले जात होते. जेव्हा तिनं घराबाहेर शिकवणीच्या निमित्ताने पाऊल टाकलं तेव्हा आपल्यासोबत घडत असलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. नंतर तिने पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती. तिथून घरी जाण्यासाठी अनेकदा माझ्यावर दबाव देखील आणला होता. वन स्टॉप सेंटरने माझ्या कुटुंबातील सदस्यांकडून पैसे घेतले आहेत.'

'गावात 1000 मुली याच संकटात गुंतून पडल्या'

या प्रकरणात माध्यमांशी बोलताना ती मुलगी म्हणाली की, 'आमच्या गावात 1000 मुली याच संकटात गुंतून पडलेल्या आहेत. आमच्या कुटुंबातील सदस्य ग्राहकांकडून पैसे वसुली करण्याचे काम करायचे. रतलाम पोलीस ऐकत नाहीत, नंतर भोपाळला पळून गेला आहे'. अशातच या प्रकरणी एफआरआय दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp